अर्धा डझन कच्चे लिंबू!

नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात झाली खरी पण अजूनही मार्च संपल्याचा निश्वस नाही टाकता येत. मुलांच्या परीक्षा आणि लेखा परिक्षणाच्या कामांमुळे बरेच जण व्यस्त आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याने पछाडून सोडलंय. कामावर पोहोचेपर्यंत अगदी घामाने निथळायला होतंय. या अशा परिस्थितीमध्ये मनाला थोडं प्रसन्न जर कोण करत असेल तर तो आहे फळांचा राजा – आंबा. अगदी कसा ही खावा. सगळाच्या सगळा अगदी हातावरून कोपरापर्यंत रसाची धार वाहेपर्यंत. नाहीतर बारीक फोडी करून आयतोबासारखा काटय़ाने, पोळी किंवा पुरी बरोबर आमरस करून, आणखी रॉयल म्हटलं तर ‘मिल्कशेक विथ वानिला आईसक्रीम’ आणि पुणेरी थाटात मजा लुटावी तर मँगो मस्तानीची. शिवाय पन्हे, डाळ—आंबा, चटणी तर आहेतच.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

बऱ्याच दिवसांनी सगळे लिंबू एकत्र येणार होते आणि त्यांना आज आंब्याची मेजवानीच मिळणार होती. आज सुगंधाताई सर्वांसाठी कोकणचा मेवा घेऊन येणार होत्या. तसं त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतंच. ठाणे स्टेशनजवळ येतंय असं लक्षात आल्याबरोबर खादाड जिग्ना दारापाशी उभी राहिली. सुगंधाताईंना मदद करायला! ताईंना आत घेतलं; पण मागे सोनल आहे हे तिच्या लक्षातच आलं नाही. ताईंची बॅग घेऊन सरळ आत घुसली. मागून सोनलने हळूच टपली मारल्यावर आपला हावरटपणा तिच्या लक्षात आला आणि सगळ्या जणी खो खो हसल्या. ताईने सर्वांच्या पिशव्या वेगवेगळ्या करून आणल्या होत्या. दिल्यानंतर म्हणाल्या, पुरवून खा. जिग्ना तू तर जरा सांभाळूनच. गेल्या वर्षीचं आठवतंय ना? जास्त आंबा तुला पचत नाही. आपआपलं पोट सांभाळा आणि सिझनचा आनंद लुटा. शेवटी म्हटलंय ना, पचेल ते खावं आणि रुचेल ते करावं.

इतका वेळ त्यांची मजा बघणारी सोनल आता पुढे आली आणि म्हणाली, एकदम बरोबर! पचेल ते खावं. म्हणायला आणि समजायलासुद्धा कित्ती सोप्पं आहे. हाच नियम आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत पण लागू होतो. जसं खाल्लेलं पोटाला झेपलं पाहिजे अगदी तसंच गुंतवणूक आपल्या मनस्थिती आणि परिस्थितीला झेपली पाहिजे. आमच्या भाषेत याला जोखीम घेण्याची क्षमता म्हणतात. प्रत्येक गुंतवणुकीमध्ये कुठली न कुठली जोखीम ही असतेच. उदा बघा (चौकट क्र. १) –arth03

हे सांगून सोनल जरा थांबली. कारण तिला बघायचं होतं की सगळे लिंबू हे समजून घेत आहेत का! सर्वांचे चेहरे आश्वस्त वाटल्यावर ती पुढे सांगू लागली, आपण जेव्हा एखादी गुंतवणूक करतो तेव्हा या जोखमेचा आढावा घेणे खूप महत्वाचे आहे. अगदी सुरक्षित म्हणून सगळेच पैसे जर मुदत ठेवींमधे असतील तर महागाई आणि कमी होणाऱ्या व्याजदरांचा धोका आपल्याला पत्करावा लागतो. तसंच स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक, गरजेला बाजारभावानुसार व आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळवून देवू शकेल की नाही हा धोका असतो. शेअर्स आणि म्युच्युअल फंड यामध्ये असलेली जोखीम ही सर्वसामान्य गुंतवणूकदाराला झेपेल असं नाही. म्हणूनच जसं आपण जेवताना वयोमान, आजारपण, ऋतुमान यानुसार आहार घेतो तसंच आपल्या गुंतवणुकीच्या ताटात आपल्या गरजेनुसार आणि झेपतील असे पदार्थ असायला हवे. आता प्रश्न येतो तो आपली जोखीमक्षमता किती आहे हे कसं ओळखायचं? याला फ्र२‘ ढ१ऋ्र’्रल्लॠ असं म्हणतात. त्यासाठी आपण उदाहरण घेऊ  या.   (चौकट क्र. २)

arth04

असं सांगून सोनल ने जिग्ना आणि सुनंदा ताईन्ची आर्थिक उद्धीष्टांची यादी काढली.

याआधी तिलोत्तमा आणि यास्मिनला सांगितल्याप्रमाणे जिग्नालासुद्धा तिच्या नवऱ्याबरोबर आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. किंबहुना बाकी दोघींपेक्षा जरा जास्तच. कारण जिग्ना व तिचा नवरा हे दोघेही पगाराची हमी नसणाऱ्या नोकरीमध्ये आहेत. शिवाय बचतीचं प्रमाण खूप कमी आहे. शिवाय आरोग्य विमा नसल्यामुळे आत्ताच २५,००० मुलाच्या आजारपणावर खर्च झाला आहे. मुलाचे शिक्षण, स्वत:चं घर आणि निवृत्तीची सोय करण्यासाठी दोघांनाही खूप मेहेनत घ्यावी लागणार आहे. ५ वर्षांत जर घर घ्यायचं असेल तर किमान १५-१६ लाख रुपये हातात असावे लागतील. मुलाच्या शिक्षणाचा खर्च मांडलेल्या रकमेपेक्षा बऱ्यापैकी जास्तं असण्याची शक्यता आहे. या दोघांनाही पैशाची शिस्त लवकरात लवकर लावणं खूप गरजेचं आहे. सगळे वायफळ खर्च बंद करून व्यवस्थित ठिकाणी आणि वेळेवर गुंतवणूक करूनच हे जोडपं आर्थिकरित्या सक्षम होवू शकतं. जिग्ना आणि तिचा नवरा यांना जोखिमीची  गुंतवणूक जरी आवडत असली तरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीला ती झेपणारी नव्हती. कमी दिवसात जास्तं मिळवायचे हे धोरण त्यांना पटतं; पण तोटय़ाचा झटका पचवायची क्षमता त्यांच्यात आत्ता तरी नाहीये.

(चौकट क्र. ३)

arth05

सुगंधाताई अतिशय काटकसरी आहेत. तरुणपणीच बचतीची सवय लागल्यामुळे त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये खूप मेहेनत घेतली होती. भाऊ असताना त्यांनी सगळे व्यवहार कागदोपत्री व्यवस्थितपणे ठेवले होते. मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे ताई आणि भाऊ यांनी खूप शिस्तबद्ध पद्धतीने पैसा वाचवला. पण सगळी गुंतवणूक सुरक्षित ठेवीमध्ये असल्यामुळे महागाई आणि कमी होणारे व्याजदर यांचा धोका संभवतो. जोखीम घेण्याच्या बाबतीत ताईंची स्थिती ही जिग्नाच्या अगदी उलट आहे. बचत आणि गुंतवणुकीचा दर चांगला असूनसुद्धा, ताई म्युचुअल फंड किंवा शेअर्सकडे वळत नाही. सगळाच पैसा सुरक्षित असावा ही मानसिकता असल्यामुळे त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे. शिवाय आता निवृत्ती जवळ येत असल्यामुळे त्यांना जास्त जोखीम घेणं झेपणार पण नाही.

नेहमीच बडबड करणारी जिग्ना आज मात्र शांतपणे सगळं ऐकत होती. आपल्या उधळपट्टीमुळे किती पैशाचा अपव्यय होतो आणि त्याचे पुढील आयुष्यावर काय परिणाम होतील हे आज सोनलने तिच्या मनात खोलवर रुजवलं होतं. इथून पुढे खर्च सांभाळून करायचा आणि नवऱ्याबरोबर बसून आर्थिक नियोजन करायचं तिने मनाशी पक्कं केलं. सोनलचं म्हणणं ऐकून सुगंधाताई म्हणाल्या, हो बाई! मी कधीच स्वत: नवीन पर्यायांची माहिती मिळवली नाही. आणि म्हणून मला जास्त पैसे साठवावे लागले. सुरुवातीच्या काळात मन मारून, छोटी हौसमौज टाळून जितका पैसा वाचवता आला तितका वाचवला. हेच ज्ञान आधी मिळालं असतं तर बरीच धावपळ कमी झाली असती. पण माझे डोळे उघडले ते माझ्या मुलीने आणि सोनलने. सोनलचे खूप खूप आभार.

यावर सोनल थोडी लाजतच म्हणाली, अहो काकू काय हे? माझे कसले आभार मानता? मला खरं तर तुमच्या या ग्रुपचं खूप कौतुक वाटतं. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुंतवणुकीविषयी जो काही खुलासा हवा असेल तो द्यायला मला खूप आवडेल. चला आता मी निघते. पुढच्या वेळेला मी पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे समजावेन. गुड डे! असं म्हणून सोनल उतरली.  तिलोत्तमा म्हणाली, आपण एक काम करूया. पुढच्या वेळी आपण आपलं Risk Profiling  करून सोनलला दाखवूया. म्हणजे आपण किती बरोबर आहोत हे कळेल आणि पुढची गुंतवणूक करताना आपल्याला त्याचा उपयोग पण होईल. यास्मिन ने जिग्नाचा कान हळूच पिळला आणि म्हणाली, काय मॅडम! आज सोनाराने कान टोचले ना तुझे! मग यापुढे जरा हात आखडता घे आणि नव्याने गुंतवणुकीची सुरुवात कर. मीनाक्षी म्हणाली, अप्पांना जावून सांगते की, FD, RD  मधे ठेवलेले पैसे महागाई खाऊन टाकते ते. बघूया कितपत जमतंय ते. तितक्यात सिल्वी ओरडली, ए चला! स्टेशन जवळ आलं. बाय बाय. पुन्हा भेटू.

आजची टीप :

जोखीम क्षमता प्रत्येकाच्या मनस्थिती/परिस्थितीनुसार बदलत असते. उदा. खालील गोष्टी क्षमता वाढवतात —

१. कमी जबाबदारी

२. नियमित पगार

३. अधिक उत्पन्न आणि बेतात खर्च

४. गुंतवणुकीसाठी जास्त काळ

५. गुंतवणूकसंबंधी पूर्ण माहिती

६. नुकसान सहन करण्याची तयारी

७. गरजेसाठी कर्ज (नियमित मासिक कमाईच्या ४०% पर्यंत  EMI/हप्ता)

या गोष्टींमुळे जोखीम क्षमता कमी होते –

१. अधिक जबाबदारी

२. अनियमित पगार

३. कमी पगार किंवा खूप खर्च

४. गुंतवणुकीसाठी कमी वेळ

५. स्वत: पूर्ण माहिती न मिळवता दुसऱ्याच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे

६. गुंतवणूक सुरक्षित राहावी अशी मनस्थिती असणे

७. खर्च करण्यासाठी कर्ज काढणे

प्रत्येक गुंतवणूकदाराने या सर्वांचा नीट विचार करणे गरजेचे आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागाराला भेटून, Risk Profiling करून मग गुंतवणूक केली तर ती जास्त फायद्याची असेल.

नोट : वरील नमूद नावांचा कुणाही व्यक्तीशी- जीवित वा मृत – संबंध नाही. या व्यक्ती काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com