अर्धा डझन कच्चे लिंबू!   भाग – १०

वसुबारशीची देऊन चाहूल, दिवाळीने ठेवलं पाऊल. धनत्रयोदशी चढवेल सोन्या-चांदीला, नरक चतुर्दशी तुडवेल कडू कारीटय़ाला. लक्ष्मीपूजनाची होता जय्यत तयारी, स्वच्छता नांदू लागेल दारोदारी. नवरा-बायको आनंदात साजरा करतील पाडवा, भाऊबीज वाढवेल भावंडांच्या नात्यात गोडवा.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती
Independent rehabilitation system for mentally ill patients Mumbai print news
मानसिक आजारमुक्त रुग्णांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व्यवस्था!

रांगोळीच्या सजावटीत, फराळाच्या संगतीत, फुलेल दिवाळी, पुन्हा एकदा प्रकाश करेल अंधाराची राख-रांगोळी.
मंगल प्रकाशाने उजळो सर्वाचे जीवन, नवीन उत्साहाने सुरू होवो आर्थिक नियोजन!

दिवाळीची सगळी तयारी नुकतीच उरकून रिया पुन्हा नवीन जोमाने आर्थिक नियोजनासाठी सज्ज झालेली आहे. भाऊबीजेमध्ये मिळणारी पाकिटे उघडून त्यात असलेल्या रकमेचं काय करायचं हे तिने आधीच ठरवून ठेवलं होतं. लहानपणी हक्काने आपल्याला आवडलेली वस्तू मागणारी रिया आता अतिशय हुशारीने भाऊबीजेला ‘कॅश ओन्ली’ असं सांगते.

थोडंस हिच्याबद्दल आपण जाणून घेऊया. एका मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबात वाढलेली रिया, लहानपणापासून जबाबदारीचे धडे गिरवत होती. वडिलांचा स्वत:चा व्यवसाय असल्यामुळे तिला पैशाचं महत्त्व लवकरच समजू लागलं होतं. शिवाय बँकेत नोकरी करणारे काका-काकू यांच्याकडूनसुद्धा ती बँकेचे व्यवहार समजून घेत मोठी होत होती. स्वभावाने अगदी धडाकेबाज असणाऱ्या रियाने अर्थशास्त्रसारखा अतिशय गंभीर विषय निवडून त्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर गेली १३ वर्षे ती वित्तीय क्षेत्रात काम करत आहे.

सुरुवातीचा पगार हा बँक ठेवी, पोस्टातल्या ठेवी आणि आयुर्विमा यामध्ये गुंतवला. कामातल्या अनुभवामुळे ती हळूहळू म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्येसुद्धा पैसे गुंतवू लागली. स्वत:चा पगार ती नीट सांभाळून जास्तीत जास्त गुंतवणूक करत होती. वडिलांचा व्यवसाय आणि मोठय़ा भावाची नोकरी असल्यामुळे, तिच्यावर आर्थिक जबाबदारी कधीच नव्हती. परंतु एक जबाबदार मुलगी म्हणून तिने स्वत:चे सगळे खर्च सांभाळून भविष्याची तरतूद करायची ठरवली.

तिच्या गुंतवणुकीच्या प्रवासात तीन स्पीड ब्रेकर तिला लागले:

१. आई-वडिलांचं आजारपण

सगळं व्यवस्थित चालू असताना अचानकपणे उद्भवलेल्या आई-वडिलांच्या आजारपणामुळे तिच्या कुटुंबावर आर्थिक ताण आला. त्यांच्या दीर्घकाळ टिकलेल्या आजारपणामागे भरपूर पैसा खर्च झाला. या वेळी त्यांच्याकडे आरोग्यविमा कमी होता आणि म्हणून स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागला.

२. नोकरी सुटणे  

२००८ सालच्या आर्थिक संकटानंतर वित्तीय क्षेत्रातील नोकरदार वर्गासमोर हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. आपली नोकरी कधीपर्यंत टिकणार? तिने कधी विचारसुद्धा केला नव्हता, पण एक दिवस तिलासुद्धा नोकरीतून कमी करण्यात आलं आणि नेमका तो काळ तिच्या वडिलांच्या आजारपणाचा असल्यामुळे तिला दुहेरी चटके सहन करावे लागले. सुदैवाने आधी जमवलेल्या गुंतवणुकीमुळे थोडा ताण कमी झाला, परंतु पुढे कसं होणार या प्रश्नाने तिला बराच काळ सतावलं.

३. शेअर बाजारातील नुकसान

‘रिसर्च अनालिस्ट’ असल्यामुळे तिला शेअर बाजाराची चांगली ओळख होती. अनेक कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल माहिती पुरवणे हे तिचं रोजचं काम होतं आणि यामुळेच शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये तिने २००७ पासून गुंतवणूक करायला सुरुवात केली. २००८ साली जेव्हा शेअर बाजार खाली यायला सुरुवात झाली तेव्हा तिला नुकसान सहन करावं लागलं.

या सर्व अनुभवांमुळे ती आर्थिक नियोजनात प्रगल्भ होत गेली. आपल्या पुढील आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी आणि जोखीम नियोजन व्यवस्थितरीत्या करण्यासाठी तिने चांगलाच चंग बांधला. तिने तिचं आजवरचं आर्थिक नियोजन खालील पद्धतीने केलं आहे:

* आरोग्य विमा

तिच्या वडिलांनी तिचा आरोग्य विमा काढला होता. पण आई-वडिलांच्या आजारपणामुळे जो खर्च झाला त्यामुळे तिला हे कळलं की आरोग्य विम्याचं कवच वाढत्या खर्चानुसार वाढविणं गरजेचं आहे. नाही तर चांगलाच फटका बसू शकतो. म्हणून वडिलांनी काढलेल्या विम्याची रक्कम तिने वाढवली आणि यापुढेही गरजेनुसार वाढविणार आहे.

* आयुर्विमा

सर्वाप्रमाणे तिच्याही बाबतीत कुणी तरी सांगितली म्हणून कुठली तरी पॉलिसी घेतली असं झालं. परंतु जेव्हा समजायला लागलं तेव्हा तिने पॉलिसी काढताना तिचं महत्त्व पहिलं समजून मग गुंतवणूक केली.

* म्युच्युअल फंड

नोकरीला लागल्यापासूनच तिने म्युच्युअल फंडांमध्ये छोटय़ा छोटय़ा ‘एसआयपी’ केल्या आणि जसजसा अनुभव मिळत गेला, तसतसं तिने रक्कम वाढवत नेली.

* शेअर्स

२००८ मध्ये नुकसान सहन केल्यावर ती एक गोष्ट शिकली – शेअर बाजारात टिकायचं असेल तर खरेदी स्वस्त आणि विक्री महाग हे सूत्र कायम लक्षात ठेवूनच गुंतवणूक करावी. कधी कधी तर पैसे बँकेत ठेवलेले बरे पण उगीच काही तरी घ्यायचं म्हणून गुंतवणूक करू नये. चांगले शेअर्स हे दीर्घ काळात चांगली वाढ देतात आणि म्हणून गुंतवणूक सगळी माहिती नीट मिळवून आणि स्वत:च्या सगळ्या शंकांचे समाधान झाल्यावरच करावी असे तिचं ठाम मत आहे.

* कर नियोजन

कर वाचविण्यासाठी आणि त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी तिने ‘ईएलएसएस’चा वापर केला. परंतु असं करताना तिने तिचे इमर्जन्सी फंड पण तयार करून ठेवले होते. म्हणून कर भरावा लागला तरी चालेल, पण वेळेला पैसा हातात असणं महत्त्वाचं असतं.

तिने काही धडे वाचकांसाठी पण दिले आहेत, ते असे :

१. स्वत:ची गाडी

नवीन नोकरी मिळाली किंवा कुणी तरी कर्ज देतंय म्हणून गाडी घेणं चुकीचं आहे. आपल्याला खरंच गाडीची गरज असेल तर नक्की घ्या, परंतु कर्जाच्या विळख्यात शक्यतो अडकू नका. आपला पगार आणि नोकरी किती स्थिर आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची खरी गरज आहे हे बघितल्यानंतरचं कर्ज काढा. जमेल तेवढी बचत करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

२. रिटायरमेंट फंड बनवायची सुरुवात लवकर करा

नोकरी लागल्या लागल्या रिटायरमेंट फंड जमवायला लागा. कारण आजच्या परिस्थितीत कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून थोडी थोडी का होईना गुंतवणूक लवकर सुरू करायची. एसआयपी एक खूप मोठं शस्त्र आहे, त्याचा वेळेवर आणि शक्य तितका जास्त वापर करून गुंतवणूक करावी. खालील तक्ता तिचं म्हणणं स्पष्ट करतो. एक टक्का मासिक परताव्याच्या दराने आपली एसआयपी गुंतवणूक खालील पद्धतीने फंड तयार करू शकते. (तक्ता पाहावा)

३. जोखीम पेलायची क्षमता तपासून पोर्टफोलिओ बनवा

१०० वजा वय म्हणजे शेअर बाजारासंबंधित गुंतवणूक असं एक ढोबळ गणित समजून गुंतवणूक करावी. म्हणजेच तिशीत असणाऱ्यांनी ७० टक्के म्युच्युअल फंड आणि शेअर्स तर ३० टक्के बँक ठेवी, डेट म्युच्युअल फंड, सुरक्षित गुंतवणूक प्रकार अशा पद्धतीने पोर्टफोलिओ बनवावा. वाढत्या वयानुसार अधिक जोखमीची गुंतवणूक कमी करावी आणि सुरक्षित गुंतवणूक वाढवावी. तसा जोखीम क्षमतेचा आणि वयाचा काहीच संबंध नाही, पण तरीही सुरुवातीला हे गणित वापरायला काहीच हरकत नाही.

४. पगाराच्या पलीकडे विचार करायला हवा 

सर्वसाधारणपणे एकदा नोकरी लागली की आपण तिच्यात पूर्णपणे गुंतून जातो. पगार कधी येतो आणि कसा संपतो हेसुद्धा बघायला वेळ काढत नाही. पैसा अपुरा पडायला लागला की नवीन नोकरी शोधतो. पण खरी गरज असते ती म्हणजे वाढीव पैसे कमावण्यासाठी दुसरे पर्याय शोधण्याची. नुसत्या नोकरीवर अवलंबून न राहता काही तरी असे खटाटोप केले पाहिजे की ज्याच्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळेल.

या सर्व गोष्टींची माहिती दिल्यावर तिचं असं म्हणणं आहे की आर्थिक नियोजन हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे, मग तो नवीन नोकरी लागलेला असो का रिटायर झालेला, स्त्री असो व पुरुष. ज्या प्रकारे आपण सगळे पैसे एका खिशात ठेवत नाही, त्याच प्रकारे आपला पैसा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवून ठेवावा. यामुळे आर्थिक स्थैर्य वाढून आत्मविश्वासदेखील वाढतो.

(टीप : गोपनीयता राखण्याकरता गुंतवणूकदार मैत्रिणीचे नाव बदलले आहे.)

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com