म्युच्युअल फंडातून गुंतवणूक नेमकी केव्हा काढून घ्यावी याची ढोबळमनाने दोन कारणे सांगता येतील. पहिले कारण, अर्थातच जेव्हा तुमचे वित्तीय ध्येय पूर्ण झालेले असते किंवा तुम्ही वित्तीय ध्येयाच्या जवळ पोहोचलेले असता तेव्हा. दुसरे कारण, तुमची गुंतवणूक असलेला फंड आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल तेव्हा..

संजीवनी नार्वेकर या एलआयसीमध्ये नोकरी करतात. वयाची चाळिशी उलटल्यावर त्यांनी २०१३ मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीस सुरुवात केली. दरमहा ३,००० रुपयांच्या नियोजनपूर्वक पद्धतीने गुंतवणुकीने (एसआयपी) सुरुवात केलेल्या संजीवनी यांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत होता. त्यांना जानेवारी २०१६ मध्ये वेतनवाढीमुळे पगाराची थकबाकी मिळाली. थकबाकीपोटी मिळालेल्या रकमेतील मोठा हिस्सा त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतविला. संजीवनी यांची आजपर्यंत ५.६५ लाखाची म्युच्युअल फंडात गुंतवणूक झाली असून १२ सप्टेंबर २०१७च्या ‘एनएव्ही’नुसार त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य ६.६७ लाख रुपये इतके असून परताव्याचा दर १८.०३ टक्के आहे.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली
trump organization found guilty In civil fraud case
अन्वयार्थ : उद्यमी ट्रम्प यांचे फसवे ‘उद्योग’!

श्रेया भावे अभियांत्रिकीची पदवी घेऊन २०१३ मध्ये नोकरीला लागल्या या महिन्यांत त्यांनी नोकरीची चार वर्षे पूर्ण करतील. श्रेया यांच्या वडिलांनी नोकरीला लागल्यापासून त्यांच्या पगारातील एक हिस्सा म्युच्युअल फंडात गुंतविण्यास सुरुवात केली. श्रेया यांनी नियोजनपूर्वक पद्धतीने केलेल्या ७.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १२ सप्टेंबर २०१७च्या ‘एनएव्ही’नुसार गुंतवणुकीचे मूल्य १०.६६ लाख रुपये झाले आहे. श्रेया यांना त्यांच्या गुंतवणुकीवर १७.२३ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे.

प्रतिमा राजाध्यक्ष ऑगस्ट २०१३ मध्ये वयोमानानुसार राष्ट्रीयीकृत बँकेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी त्यांना मिळालेल्या सेवानिवृत्तीच्या लाभापैकी २८ लाख रुपये गुंतवणूक मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार म्युच्युअल फंडाच्या चार बॅलन्स्ड फंडात गुंतविले. प्रतिमा यांना त्यांच्या गुंतवणुकीवर २२.२२ टक्के वार्षिक परतावा मिळाला असून १२ सप्टेंबर २०१७ च्या ‘एनएव्ही’नुसार गुंतवणुकीचे मूल्य ६२.२५ लाख रुपये झाले आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे असलेल्या या गुंतवणूकदार भगिनींना आज म्युच्युअल फंडातील रक्कम काढून घ्यावी किंवा कसे हा प्रश्न पडला आहे. सर्वसाधारणपणे बाजार निर्देशांक जेव्हा नवीन शिखर गाठून खाली येतात तेव्हा आधीचा परतावा वर्तमान परताव्यापेक्षा अधिक असल्याने गुंतवणूकदारांच्या मनात या प्रकारच्या शंका उद्भवतात.

म्युच्युअल फंडातून गुंतवणूक नेमकी केव्हा काढून घ्यावी याची ढोबळमनाने दोन कारणे सांगता येतील. पहिले कारण अर्थातच जेव्हा तुमचे वित्तीय ध्येय पूर्ण झालेले असते किंवा तुम्ही वित्तीय ध्येयाच्या जवळ पोहोचलेले असता तेव्हा. दुसरे कारण तुमची गुंतवणूक असलेला फंड आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल अथवा अंडरपरफॉर्मिग असेल तर फंडातून गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करायला हरकत नाही.

वरील प्रातिनिधिक उदाहरणापैकी प्रत्येक जण आपापल्या वित्तीय ध्येयांपासून अद्याप दूर आहे. संजीवनी नार्वेकर यांनी आपल्या सेवा निवृत्तिपश्चातची तरतूद म्हणून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. श्रेया भावे यांच्या वडिलांनी त्यांची बचत करण्यासाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग निवडला. तर प्रतिमा राजाध्यक्ष यांना सेवा निवृत्तिवेतन मिळत असल्याने महागाईपेक्षा अधिक परतावा मिळावा यासाठी त्यांनी म्युच्युअल फंडाची निवड केली. आज केवळ चांगला परतावा आहे म्हणून म्युच्युअल फंडात गुंतविलेला निधी काढून घेणे योग्य नव्हे. संजीवनी नार्वेकर यांच्या सेवानिवृत्तीला अद्याप बारा वर्षे शिल्लक आहेत. मुलीचे शिक्षण अद्याप तीन वर्षे सुरू राहणार आहे. तिला परदेशी शिकायला जाण्यास तीन वर्षे आणि तिच्या लग्नास किमान सात वर्षांचा अवकाश आहे. या व्यतिरिक्त दुसरे वित्तीय उद्दिष्ट त्यांच्यासमोर नाही. थोडक्यात नजीकच्या काळात मोठा खर्च नाही. म्युच्युअल फंडातून ही रक्कम काढून घेतल्यास या रकमेचे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आणखी दोन वर्षांनतर मुलीच्या परदेशी शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीसाठी संजीवनी यांनी समभाग गुंतवणुकीतील निधी कमी जोखमीच्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात करणे योग्य ठरेल.

श्रेया भावे यांचा विवाह अद्याप निश्चित झालेला नाही. विवाह कोणत्या मुलाशी होणार, दोघांची प्राथमिकता नेमकी कशाला असेल. विवाहापश्चात घर घ्यावे लागेल का हे अनिश्चित असताना म्युच्युअल फंडातील रक्कम काढणे हे आर्थिक सुज्ञपणाचे लक्षण नक्कीच नव्हे. केवळ निर्देशांक वर आहेत आणि गुंतवणूक मूल्यात वाढ झाल्यामुळे, एसआयपी थांबविणे हे आततायीपणाचे ठरेल.

प्रतिमा राजाध्यक्ष यांची गुंतवणूक चार वर्षांत दुप्पट झाली आहे. ६५ टक्के समभाग आणि ३५ टक्के रोखे अशी गुंतवणूक असलेल्या बॅलन्स्ड फंडात त्यांनी हे पैसे गुंतविले आहेत. ६५ वर्षे वय असलेल्या प्रतिमा राजाध्यक्ष यांची ६५ टक्के रक्कम रोख्यांत हवी. परतावा जरी अधिक दिसला तरी गुंतवणुकीच्या जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने समभाग गुंतवणुकीचे वाढीव प्रमाण कमी करायला हवे. हे प्रमाण मूळ पदावर आणण्यासाठी बॅलन्स्ड फंडातून पैसे काढून रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. रोखे आणि समभाग गुंतवणुकीचे योग्य प्रमाण राखल्याने आपल्या गुंतवणुकीच्या मूल्यांत घट होईल ही भीती काही प्रमाणात नक्कीच कमी होईल.

नफा वसूल करावयास म्युच्युअल फंड काही एका विशिष्ट कंपनीचे समभाग नव्हे. म्युच्युअल फंड म्हणजे फंडांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांतून केलेली गुंतवणूक होय. निधी व्यवस्थापकांकडे जोखीम व्यवस्थापन करण्याची स्वत:ची यंत्रणा असते. त्यामुळे नजीकच्या काळात बाजार घसरला तरी या घसरणीची कमीत कमी झळ फंडाच्या एनएव्हीला बसेल याची निधी व्यवस्थापक काळजी घेत असतात. बाजारात घसरण झाल्यास आपल्या गुंतवणुकीच्या मूल्यांत घट होईल या भीतीपोटी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक काढून घेण्याची आवश्यकता नाही.

वरील उदाहरणांपैकी संजीवनी नार्वेकर आणि श्रेया भावे या म्युच्युअल फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करीत आहेत. बाजारातील चढ-उतारांचा योग्य रीतीने सामना करता यावा यासाठीच नियोजनबद्ध गुंतवणूक करण्याचा तज्ज्ञ आग्रह धरतात.

कामगिरी खालावली तर..?

फंडाची खालावलेली कामगिरी म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्यास एक निश्चितच कारण ठरू शकते. प्रत्येक फंडाला कधी ना कधी खराब कामगिरीचा सामना करावा लागतो. केवळ कामगिरी खालावली म्हणून पैसे काढून घेण्याऐवजी फंडाची खालावलेल्या कारणांचा अभ्यास करणे गरजेचे असते. फंडाच्या निधी व्यवस्थापन करण्याच्या धोरणांत बदल, गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या उद्योग क्षेत्रांचा प्राधान्यकम बदलणे, निधी व्यवस्थापकांत बदल अशी एक ना अनेक कारणांनी फंडाची कामगिरी खालावण्याची शक्यता असते. दीर्घ काळ चांगली कामगिरी असलेला फंड तात्पुरता लहान कालावधीसाठी कमी परतावा देऊ  शकतो. या कारणांचा शोध घेणे गरजेचे असते. चार किंवा त्यापेक्षा अधिक तिमाहीत फंडाच्या क्रमवारीत घसरण होत असेल तर फंडाची कामगिरी खालावली असे मानता येईल. फंडाच्या गुंतवणूक धोरणांत केलेल्या बदलांचा परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी दोन तिमाहींचा कालावधी फंड व्यवस्थापकास देणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कामगिरी खराब असल्यास फंडाची कामगिरी खालवली असे म्हणता येणार नाही. फंडाची कामगिरी तपासण्यासाठी फंडाची एकांगी कामगिरी तपासण्याऐवजी फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत तपासणे गरजेचे आहे. अनेकदा फंड व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे खूपच अधिक निधी फंडात गुंतविल्यामुळे फंड व्यवस्थापनाला गुंतवणुकीच्या नवीन संधीचे वावडे असते. साहजिकच फंडाची कामगिरी खालावण्याची शक्यता निर्माण होते. विशेषत: स्मॉल अ‍ॅड मिड कॅप फंडाच्या बाबतीत असे वारंवार घडते. अशा वेळी सुज्ञ निधी व्यवस्थापक काही कालावधीसाठी नवीन गुंतवणूक घेणे बंद करतात. अशा फंडात सुरू असलेली नियोजनपूर्वक पद्धतीने गुंतवणूक सुरू राहते परंतु नवीन नियोजनपूर्वक पद्धतीने गुंतवणूक नोंदविता येत नाही.

या व्यतिरिक्त ‘सेबी’च्या एका निर्णयामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेण्यास तिसरे कारण भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे. ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांना म्युच्युअल फंड योजनांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहेत आणि यासाठी नियम तयार करण्यासाठी समितीची स्थापनासुद्धा केली आहे. उदाहरणार्थ तुम्ही मध्यम किंवा कमी जोखीम पत्करू शकणारे गुंतवणूकदार आहात म्हणून तुम्ही एखाद्या शॉर्ट टर्म फंडाची निवड केली आहात. भविष्यात या नवीन नियमानुसार या फंडाचे गुंतवणूक धोरण बदलून हा फंड क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड म्हणून अस्तित्वात आला तर हा फंड तुमच्या गुंतवणूक कक्षेला साजेसा ठरणार नाही. क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड हे धाडसी गुंतवणूकदारांसाठी असतात. अशा परिस्थितीत या फंडातून बाहेर पडणे योग्य ठरेल. थोडक्यात भाकरी का करपली, घोडा का अडला यांचे उत्तर न परतल्यामुळे असे देतात. त्याप्रमाणे म्युच्युअल फंडसुद्धा याला अपवाद नाहीत. गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर आपण गुंतवणूक केलेल्या फंडांचासुद्धा आढावा घेणे गरजेचे आहे.

arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully