News Flash

सरकारी बँकांत १.१७ लाख कोटींचे घोटाळे

स्टेट बँकेत या नऊ महिन्यांत ४,७६९ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे नोंदविली

| February 14, 2020 04:32 am

(संग्रहित छायाचित्र)

इंदूर : चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १८ बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याची ८,९२६ प्रकरणे घडून आली आणि त्यायोगे बँकांची १.१७ लाख कोटी रुपयांची रक्कम फस्त केली गेली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला या घोटाळ्यांचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. येथील माहिती-अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडून अधिकृतपणे ही माहिती मिळविली आहे.

स्टेट बँकेत या नऊ महिन्यांत ४,७६९ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे नोंदविली असून, त्यातून ३०,३०० कोटी रुपयांचा फटका सोसला आहे. म्हणजेच घोटाळ्यात लयाला गेलेल्या एकूण १.१७ लाख कोटींपैकी २६ टक्के नुकसानीचा भार एकटय़ा स्टेट बँकेने सोसला आहे.

त्या खालोखाल नीरव मोदी, चोक्सी या हिरे व्यापाऱ्यांनी गंडा घातलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे ताज्या २९४ प्रकरणात १४,९२८.६२ कोटी रुपये अडकले असल्याचे या माहिती अहवालातून दिसून येते. तर या कालावधीत बँक ऑफ बडोदाचे २५० प्रकरणात ११,१६६.१९ कोटी रुपये फस्त झाले आहेत.

अलाहाबाद बँकेत घोटाळ्याच्या प्रकरणांची संख्या ८६० इतकी मोठी असली तर त्या संबंधित रक्कम मात्र ६.७८१.५७ कोटी रुपये इतकी आहे. तर बँक ऑफ इंडियात ६,६२६.१२ कोटी रुपयांची १६१ घोटाळ्याची प्रकरणे नऊ महिन्यात घडली आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियाचे २९२ प्रकरणात ५,६०४.५५ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेचे १५१ प्रकरणात ५,५५६.६४ कोटी रुपये, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे २८२ प्रकरणात ४,८९९.२७ कोटी रुपयांना गंडा घातला गेला असल्याचे ही माहिती उघड करते.

कॅनरा बँक, युको बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या अन्य १० बँकांमध्ये मिळून १,८६७ गडबड-घोटाळ्याची प्रकरणे या नऊ महिन्यांत नोंदविली गेली आणि त्यातून या बँकांना ३१,६००.७६ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या माहिती आर्थिक गैरव्यवहारांचे अथवा घोटाळ्यांचे नेमके स्वरूप स्पष्ट केलेले नाही. शिवाय त्याच्याशी संबंधित नोंदविली गेलेली रक्कम ही बँकांना झालेले नुकसान आहे काय, हेही स्पष्ट केलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 4:32 am

Web Title: 1 17 lakh crore scams in government banks zwz 70
Next Stories
1 स्थिर दृष्टिकोनासह ‘बीबीबी-’ पतमानांकन कायम
2 मालमत्तेत एसबीआय म्युच्युअल फंड अव्वलस्थानी
3 वर्षांरंभीच महागाईचा सहा वर्षांचा उच्चांक
Just Now!
X