16 September 2019

News Flash

छतावरील सौर प्रणालीद्वारे १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य

वीजनिर्मिती शक्य असल्याची माहिती टाटा पॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशीष खन्ना यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रासह अकोला, नाशिक, पुण्यासाठी टाटा पॉवरची योजना

मुंबई : परदेशांत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीला मोठे महत्त्व देण्यात येत असून मुंबई महानगर प्रदेशात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य असल्याची माहिती टाटा पॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशीष खन्ना यांनी दिली. तर मुंबईसह अकोला, नाशिक, पुणे या शहरांत छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी टाटा पॉवर काम करत असल्याची माहिती टाटा पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी दिली.

दिल्लीत छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून २२०० मेगावॉट वीजनिर्मितीची केली जात असून मुंबई-ठाणे, रायगड-पालघर या मुंबई महानगर क्षेत्रात ही क्षमता १४०० मेगावॉट आहे, असे खन्ना यांना सांगितले.

मुंबईतील टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या सात लाख ग्राहकांसाठी निम्म्या दरात वातानुकूलन यंत्रणा देण्याबाबतचा उपक्रम व्होल्टासच्या सहाय्याने मंगळवारी सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रवीर सिन्हा व टाटा पॉवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईत दरवर्षी सुमारे चार लाख नव्या वातानुकूलन यंत्रांची विक्री होते. व्होल्टासची ही नवी वातानुकूलन यंत्रे निम्म्या किंमतीत मिळतीलच शिवाय ती ऊर्जाबचत करणारी यंत्रे असल्याने तीन ते चार वर्षांत पैसे वसूल होतील इतकी बचत वीजबिलात होईल, असे यावेळी सांगण्यात आले. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी, त्यांना वीजवापराची माहिती कळावी, देयकांची माहिती मिळावी यासाठी एक अ‍ॅप मायक्रोसॉफ्टकडून विकसित ‘कायझाला’ या अ‍ॅपचे अनावरण यावेळी करण्यात आले.

वैयक्तिक वापर आणि नंतर ग्रिडमध्ये विकण्यासाठी उपयुक्त अशी छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी देशातील विविध शहरांत करण्याचे उद्दिष्ट टाटा पॉवरने ठेवले आहे.

First Published on September 11, 2019 1:01 am

Web Title: 1400 mw electricity can be generated through rooftop solar system zws 70