News Flash

‘महाजॉब्स’वर आठवडाभरात १,६६७ कंपन्यांची नोंदणी

मनुष्यबळ हवे असलेल्या उद्योजकांचा वाढता कल

‘महाजॉब्स’वर आठवडाभरात १,६६७ कंपन्यांची नोंदणी
संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीनंतर कंपन्यांना आवश्यक कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळाची भासत असलेली कमतरता लक्षात आल्यानंतर एमआयडीसी आणि राज्याच्या उद्योग विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळाला दमदार प्रतिसाद दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जुलैला उद्घाटन केलेल्या या संकेतस्थळावर मनुष्यबळ हवे असलेल्या १,६६७ कंपन्यांनी आठवडाभराच्या कालावधीत नोंदणी केली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्धता आणि कंपन्यांना समर्पक मनुष्यबळ अशा दुहेरी हेतून तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर रोजगारइच्छुक २,१६,८०७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी दिली. मात्र नोकरी मिळविण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, कौशल्याबाबतचा तपशील आणि अधिवास प्रमाणपत्र अशी संपूर्ण माहिती नोंदवावी, असे अनबलगन यांनी आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:13 am

Web Title: 1667 companies registered on mahajobs during the week abn 97
Next Stories
1 विमा कंपन्यांना कोविड-१९ विमाछत्राचे भरते!
2 सेन्सेक्स, निफ्टीसत्र उच्चांकाला
3 महागाई ६ टक्क्यांवर
Just Now!
X