गेल्या आर्थिक वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेने छापलेल्या नोटांची संख्या कमी असून ११ नोव्हेंबरअखेपर्यंत, सर्व मूल्याच्या नोटांमधून चलनात १७.८७ लाख कोटी रुपये असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, २०१५-१६ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने ५०० रुपयांच्या ४२९ कोटी नोटा छापल्या होत्या, तर १,००० रुपयांच्या नोटांची संख्या ९७.७ कोटी होती. ५०० व १,००० रुपयांच्या नोटांचे हे मूल्य ३.११ लाख कोटी रुपयांहून होते.

२०१४-१५ मधील २,३६५ कोटी २० लाख छापल्या गेल्या नोटांच्या तुलनेत २०१५-१६ आर्थिक वर्षांत छपाई करण्यात आलेल्या नोटांची संख्या कमी आहे.

मार्च २०१६ अखेर जुन्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या १,५७० कोटी होती, तर चलनातून बाद झालेल्या १,००० रुपयांच्या नोटांची संख्या ६३२ कोटी होती. चलनातील या जुन्या नोटांचे मूल्य एकूण १४.१७ लाख कोटी रुपये होते.

१० नोव्हेंबरच्या शुक्रवारपासून निश्चलनीकरण प्रक्रियेत चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा केवळ बँकेतच जमा करण्याची मुभा आहे. ती येत्या ३० डिसेंबपर्यंत लागू आहे.

[jwplayer DfBlas1q-1o30kmL6]