थेट विदेशी गुंतवणुकीसाठी विविध १९ प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. संरक्षण क्षेत्रातील या प्रस्तावांमध्ये रिलायन्स, टाटा, महिंद्र समूहातील कंपन्यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाला प्रोत्साहनपूरक दिशेने पाऊल टाकत गेल्या आठवडय़ातच औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या (डीआयपीपी) सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने औद्योगिक परवान्यांना मंजुरी दिल्याचे केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्रालयाने याबाबत आहे.
संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्यात आली असल्याने , डीआयपीपीकडे सादर झालेल्या प्रस्तावांपैकी १४ प्रतीक्षित प्रस्तावांना संबंधित परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिलेल्यांमध्ये रिलायन्स एरोस्पेस टेक्नॉलॉजीज, भारत फोर्ज, महिंद्र टेलिफोनिक इंटिग्रेटेड सिस्टीम्स, टाटा अ‍ॅडव्हान्स मटेरिअल्स, पुंज लॉइड यांचा समावेश आहे.