11 July 2020

News Flash

चिनी अर्थव्यवस्थेचा २७ वर्षांतील नीचांक

आर्थिक विकास दर पहिल्या तिमाहीत ६.४ टक्के होता तो दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चीनच्या आर्थिक विकास दराने दुसऱ्या तिमाहीत गेल्या सत्तावीस वर्षांतील नीचांक गाठला असून तो ६.२ टक्के नोंदला गेला आहे. गेल्या जवळपास तीन दशकातील हा कमी विकास दर असून चीनची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असल्याने  त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.

आर्थिक विकास दर पहिल्या तिमाहीत ६.४ टक्के होता तो दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के झाला आहे. २००९ मधील आर्थिक पेचप्रसंगावेळीही चीनचा आर्थिक विकास दर ६.४ टक्क्य़ांच्या खाली गेला नव्हता, पण या वेळी निर्यातीवर अवलंबून असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. परदेशी व्यापारात हळूहळू होत चाललेली घटही याला कारणीभूत आहे असे दिसून येत आहे. २०१९ च्या पहिल्या पर्वात चीनचा आर्थिक विकास दर ६.३ टक्के होता, त्या वेळी अर्थव्यवस्था ६.५६ लाख कोटी डॉलर्सची होती, असे नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने म्हटले आहे.

आर्थिक विकास दराचे चीनने दाखवलेले वार्षिक उद्दिष्ट हे ६ ते ६.५ टक्के होते, त्यामुळे आताचा विकास दर कमी झाला असला तरी तो या लक्ष्याशी सुसंगत मानला जात आहे. २०१८ मध्ये चीनने ६.६ टक्के आर्थिक विकास दराचा अंदाज दिला होता. एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा ५४.९ टक्के असून प्राथमिक उद्योगांचा वाटा तीन टक्के वाढला आहे. दुय्यम उद्योगांचा वाटा ५.८ टक्के वाढला आहे. चीनची आयात जुलैत ७.३ टक्क्य़ांनी कमी झाली असून वस्तूंच्या खपाचा आर्थिक विकास दरातील वाटा ६०.१ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2019 2:11 am

Web Title: 27 year low of chinese economy abn 97
Next Stories
1 ‘रोखे फंड लवकरच विश्वासपात्र’
2 ‘एलआयसी’विरूद्ध याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
3 स्टेट बँकेकडून निधी हस्तांतरण व्यवहार स्वस्त
Just Now!
X