वार्षिक तुलनेत संख्या कमी; आयटीआर-१चा २.५२ कोटींकडून भरणा

नवी दिल्ली : चालू निर्धारण वर्ष व गेल्या वित्त वर्षांसाठीचे प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरण्याची मुदत काही तासांवर येऊन ठेपली असताना २९ डिसेंबर २०२० पर्यंत ४.५४ कोटी करदात्यांनी विवरणपत्र भरले आहे.

वित्त वर्ष २०१९-२० करिता प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत यापूर्वी तीन वेळा वाढविण्यात आली आहे. गुरुवार, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत विवरणपत्र दाखल करणे आवश्यक होते. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.

मंगळवापर्यंत दाखल विवरणपत्रांमध्ये २.५२ कोटी करदाते आयटीआर-१चे आहेत. २९ ऑगस्ट २०१९ पर्यंत त्यांची संख्या २.७७ कोटी होती. यंदा ती कमी झाली आहे. तर आयटीआर-४ सादर करणाऱ्यांची संख्या १ कोटी आहे.

गेल्या वर्षी त्यांची संख्या कमी, ९९.५० लाख होती. आयटीआर-२ प्राप्तिकर विवरणपत्रे ३३.९३ लाखांपुढे तर आयटीआर-५ विवरणपत्रांची संख्या ७.०९ लाख आहे. आयटीआर-७ करिता १.०४ लाख करदात्यांनी विवरणपत्रे भरली आहेत. २९ ऑगस्ट २०१९ अखेर ही संख्या ४१,९६३ होती.