चित्रपटगृहांमध्ये थ्रीडीचा थरार अनुभवलेल्या प्रेक्षकांना आता अधिक प्रगतिशील ४डी तंत्रज्ञानही लवकरच अनुभवता येईल. देशातील सर्वात मोठी सिनेगृह साखळी असणाऱ्या पीव्हीआरने अमेरिकी कंपनीच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान तिच्या निवडक सिनेगृहात सादर केले आहे.
सीजे ४डीप्लेक्स नावाचे हे तंत्रज्ञान अधिक पारदर्शक चित्रपटासाठी विकसित करण्यात आले आहे. नव्या करारानुसार, पहिल्या टप्प्यात पीव्हीआरचे हे तंत्रज्ञान नोएडास्थित लॉजिक्स सिटी सेंटरमधील १५ पडद्यांसाठी (स्क्रीन) अवलंबिले जाणार आहे. ४डी तंत्रज्ञानामुळे चित्रपटातील पाऊस, बर्फ, धुके, प्रकाश आदी नैसर्गिक दृश्ये अधिक आकर्षक दिसतील, असा पीव्हीआरचा दावा आहे. कंपनीचे विविध ४४ शहरांमधील १०६ मालमत्तांमध्ये ४७१ पडदे आहेत.