News Flash

१४ बडय़ा बँकांच्या कर्ज-थकितात ५० टक्क्य़ांहून अधिक वाढ

अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचा थेट परिणाम देशांतर्गत व्यावसायिक क्रियाकलाप थंडावण्यात झालेला दिसत असला तरी त्यातून बँकिंग व्यवसायापुढे

| November 15, 2013 02:59 am

अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचा थेट परिणाम देशांतर्गत व्यावसायिक क्रियाकलाप थंडावण्यात झालेला दिसत असला तरी त्यातून बँकिंग व्यवसायापुढे संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील आघाडीच्या ४० बँकांच्या अनुत्पादित कर्ज मालमत्तेत (एनपीए) ३८ टक्के म्हणजे सुमारे ३५,४२४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लक्षणीय म्हणजे यापैकी १४ बँकांची एनपीए मात्रा तब्बल ५० टक्के व त्याहून अधिक वधारली आहे. हीच गती राहिल्यास मार्च २०१४ पर्यंत बँकांच्या एकूण नक्त एनपीएचे प्रमाण दीड लाख कोटींपल्याड मजल गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बँकिंग व्यवस्थेतील कर्ज-थकिताचा माग घेणारे संकेतस्थळ ‘एनपीएसोर्स डॉट कॉम’ने प्रसृत केलेल्या ताज्या अहवालानुसार, ३१ मार्च २०१३ पर्यंत एकूण एनपीएचे प्रमाण ९३,१०९ कोटी रुपये असलेल्या शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या ४० बँकांच्या एनपीएमध्ये गेल्या सहा महिन्यांत आणखी ३५,४२४ कोटींची भर पडून हे प्रमाण सप्टेंबर २०१३ अखेर १,२८,५३३ कोटी रुपयांवर गेले आहे. स्टेट बँकेसह, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, आयडीबीआय बँक आणि युनियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील नावाजलेल्या बँकांच्या कर्ज-थकितात सहा महिन्यांत ३० टक्क्य़ांहून अधिक वाढ दिसून आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे कर्ज-थकिताच्या समस्येपासून आजवर अलिप्त राहिलेल्या बँकांनाही उत्तरोत्तर हा रोग जडत चालला आहे. ३१ मार्च २०१३ रोजी शून्य एनपीए असलेल्या सात बँकांच्या ३० सप्टेंबर २०१३ अखेर नक्त एनपीएचे प्रमाण ३.५%  व त्याहून अधिक वाढले आहे.
दर तिमाहीगणिक बँकांच्या कर्ज मालमत्तेची स्थिती बिघडत चालली असून, येणारा काही काळ तरी कर्जावरील व्याजाचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थितीत सुधाराची शक्यता दुरापास्तच दिसते, असे एनपीएसोर्स डॉट कॉमची मालकी असलेल्या अतिश्य समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र जैन यांनी सांगितले.
बँकांचे कर्ज थकविणाऱ्या अनेक उद्योगधंद्यांना कर्जफेड सुलभ व्हावी म्हणून बँकांनी त्यांना पुनर्रचित कर्जाचा लाभ दिला, पण ही पुनर्रचित कर्जेही थकत गेल्याचे दिसून येते आणि येत्या तिमाहीत बँकांच्या एनपीएमध्ये ही नवीन भर असेल, असेही जैन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:59 am

Web Title: 50 percent debt arrears increase of 14 major banks
Next Stories
1 कांद्याबरोबर टोमॅटोनेही भाव खाल्ला
2 सेवा कराच्या जाळ्यात ८ लाख करदात्यांची भर
3 ‘फेड दिलाशा’ने द्विशतकी उसळी
Just Now!
X