सरकारी बँकांमधील रिक्त पदांचा सर्व अनुशेष भरून काढला जाईल आणि सेवानिवृत्त होत असलेल्या ३८,००० कर्मचाऱ्यांच्या जागी ६०,००० नोकरभरती केली जाणार आहे, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये वर्ष २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये अनुक्रमे ३८,२५४, ३८,१७० आणि २१,५०० अशी रिक्त पदांची स्थिती होती, तर त्याच वर्षांत केल्या गेलेल्या नोकरभरतीचे प्रमाण अनुक्रमे ३५,५४९, ३०,३५९ आणि २४,१३३ असे राहिले आहे, अशी सिन्हा यांनी माहिती दिली.