२०१५ ची मावळती जवळ येऊन ठेपली असताना या वर्षांत व्यवसाय क्षेत्रालाही सायबर गुन्ह्य़ांचा मोठा धोका नोंदला गेल्याचे स्पष्ट झाले असून ७२ टक्के भारतीय कंपन्यांना त्याचा सामना करावा लागला आहे.
केपीएमजीने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून यामध्ये सायबर गुन्ह्य़ांविरुध्द भारतीय संस्थांची तयारी आणि गुन्हय़ांच्या पध्दतीचा शोध, त्याचा स्तर, तसेच हा धोका लक्षात घेवून करायच्या प्रतिबंधक उपाययोजनांवर भर याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीसारख्या वरिष्ठ पदावरील व्यक्ती आदी २५० हून अधिक प्रतिक्रिया या सर्वक्षणात नोंदल्या गेल्या असून देशभरातील संबंधित व्यावसायिकांचाही त्यामध्ये सहभाग आहे.
सायबर गुन्ह्य़ांचा क्राईमचा कंपन्याना सर्वाधिक धोका आहे, परंतु त्यापकी केवळ ४१ टक्केच घटनांमध्ये कार्यकारी मंडळाच्या विषयपत्रिकेचा भाग असतात, असे केपीएमजीने स्पष्ट केले आहे.

६४ टक्के सहभागींनी कंपन्यांचे संचालक/व्यवस्थापन हे सर्वाधिक असुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. बँक व वित्त सेवा क्षेत्राला सायबर गुन्हय़ांचा सर्वाधिक धोका असल्याचे ७४ टक्के सहभागींनी सांगितले. ६३ टक्क्य़ांच्या मते बहुतांशी गुन्हे मोठय़ा प्रमाणात आíथक हानीशी संबंधित आहेत. माहिती तंत्रज्ञानावर होणाऱ्या खर्चापेकी ५ टक्के पेक्षाही कमी रक्कम ही सायबर सुरक्षेवर खर्च केली जाते, असे ५४ टक्के लोकांनी नमूद केले आहे.