23 January 2021

News Flash

आबुधाबीची तेल कंपनीही ‘नाणार’मध्ये गुंतवणुकीस उत्सुक

आराम्को या कंपनीने ५० टक्के भांडवली भागीदारीसाठी यापूर्वी एप्रिलमध्ये सामंजस्य करार केला आहे.

| June 23, 2018 02:59 am

रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्प

येत्या आठवडय़ात नवी दिल्लीत सामंजस्य करार

नवी दिल्ली  : रत्नागिरीजवळ नाणार येथे प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये आबुधाबीची मोठी तेल कंपनीही गुंतवणुकीस उत्सुक आहे. या संदर्भातील सामंजस्य करारावर नवी दिल्लीत येत्या सोमवारी सह्य़ा केल्या जाणे अपेक्षित आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांच्या संयुक्तपणे प्रतिदिन १२ लाख पिंप (वार्षिक ६० दशलक्ष टन) उत्पादन क्षमता असलेला हा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारत आहेत. २०२५ सालात या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणे अपेक्षित असून, जगातील हा तिसरा मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असेल.

या प्रकल्पात सौदी अरबच्या आराम्को या कंपनीने ५० टक्के भांडवली भागीदारीसाठी यापूर्वी एप्रिलमध्ये सामंजस्य करार केला आहे. हा करार करतानाच, पुढे जाऊन हा भांडवली हिस्सा सौम्य करण्याचे आराम्कोने सूचित केले होते. आता आबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आराम्कोचा निम्मा हिस्सा ४,४०० कोटी अमेरिकी डॉलरच्या बदल्यात मिळविणार आहे. अशा तऱ्हेने सौदीच्या आराम्को आणि आबुधाबीच्या तेल कंपनीची प्रकल्पात २५ टक्के भागीदारी असेल.

आराम्कोबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक खनिज तेलाचा पुरवठा त्या कंपनीकडून केला जाणार आहे. आबुधाबी तेल कंपनीने नाणार प्रकल्पात शुद्धीकरणासाठी खनिज तेलाच्या पुरवठय़ाची हमी दिली आहे. दोन्ही कंपन्या प्रकल्पाच्या माध्यमातून खनिज तेलासाठी खात्रीचे ग्राहक मिळवू पाहत आहे. सौदी अरब हा भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे.

अनेक तेल उत्पादक राष्ट्रांकडून सध्या असेच धोरण अनुसरले जात असून, खनिज तेलासाठी दीर्घावधीचा खात्रीच्या मागणीसाठी तेलशुद्धीकरण प्रकल्पात थेट गुंतवणूक करून सहभाग घेण्यासाठी कुवेतनेही उत्सुकता दाखविली आहे. सौदी अरबने गेल्या वर्षांत इंडोनेशिया आणि मलेशियामधील तेलशुद्धीकरण कंपन्यांत अशाच धर्तीची गुंतवणूक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 2:59 am

Web Title: abu dhabi oil company is also keen to invest in nanar project
Next Stories
1 ‘एसआयपी’साठी रोखेसंलग्न फंडांना वाढती पसंती – महिंद्र एमएफ
2 मुंबई बँकेवरील निर्बंध शिथिल
3 अ‍ॅमेझॉनच्या नवागत आरोग्य कंपनीचे नेतृत्व अतुल गवांदे यांच्याकडे
Just Now!
X