मुंबई : अदानी ट्रान्समिशनची वीज वितरण कंपनी असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने २ अब्ज डॉलरच्या मध्यम मुदतीच्या आंतरराष्ट्रीय कर्ज रोख्यांच्या (ग्लोबल मीडिअम टर्म नोट्स)  विक्रीचा आराखडा जाहीर केला आहे.

‘ग्लोबल मीडिअम टर्म नोट्स’ विक्री आणि पर्यावरण रक्षण संलग्न रोखे (सस्टेनेबिलिटी लिंक्ड बॉण्ड्स) हा कंपनीच्या भांडवल व्यवस्थापन योजनेचा एक भाग असून पैकी ३० कोटी डॉलरच्या पहिल्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. आघाडीच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला असून हप्त्याच्या रकमेच्या ९.२ पट रकमेचे देकार आले आहेत. यांपैकी ४९ टक्के संस्था आशिया खंडातील आहेत तर २७ टक्के युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका  विभागातील आहेत. २४ टक्के उत्तर अमेरिका खंडातील आहेत.

अदानी समूहातील वीज कंपनी ही देशातील सर्वात मोठय़ा वीज कंपन्यांपैकी एक असून आणि मुंबईतील १.२० कोटी ग्राहकांना सेवा देते. कंपनीने ३० कोटी डॉलरची १० वर्षांंच्या मुदतीची रोखे विक्री आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केली आहे. या व्यवहारापासून सर्व मुदत कर्जे आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात एकूण ९ वर्षे मुदतीने उभी करण्यात आली आहेत.