दैनंदिन करोना रुग्णवाढीचा प्रथमच एक लाखांपुढे गेला असला तरी, या साथ-संक्रमणाच्या या  दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी भारताने पूर्ण केली आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मसिक अहवालात करण्यात आला.

भारताने करोना महामारीच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणे मात केली आणि त्यावेळची सर्वोच्च रुग्णसंख्या आणि फेब्रुवारीत झालेली या दुसऱ्या लाटेची सुरुवात यात १५१ दिवसांचे अंतर आहे. जगभरात इतरत्र दुसरी करोना लाट अनुभवणाऱ्या देशांमध्ये हे अंतर यापेक्षा खूप कमी दिसले आहे आणि हीच भारताच्या दृष्टीने जमेची बाब असल्याचे हा अहवाल सांगतो.

भारताच्या अर्थस्थितीबाबत संकेत देणाऱ्या आकडेवारीवरून देशाने अधिक मजबूत आणि बळकट होण्याच्या मार्गावर आगेकूच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दरम्यान देशाला मिळालेल्या वाढीव कालावधीने, विषाणूजन्य साथीचा धोका रोखण्यासाठी पुरेशी सज्जता करता आली, असे अर्थमंत्रालयाने विश्वाास व्यक्त केला आहे.