18 January 2021

News Flash

लक्ष्मी मित्तल श्रीमंत-सूचीतून बाहेर

मित्तल यंदा तेथील अव्वल १०० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीच्याही बाहेर फेकले गेले आहेत.

| December 19, 2015 04:27 am

स्टील आयकॉन’ लक्ष्मीनिवास मित्तल

दक्षिण आफ्रिकेत सलग सहा वर्षे राखलेले स्थान लयाला
जागतिक स्तरावरील पोलादाच्या किमतीतील घसरण, परिणामी भांडवली बाजारात रोडावलेले समभाग मूल्य यांचा फटका अनिवासी भारतीय व ‘स्टील आयकॉन’ लक्ष्मीनिवास मित्तल यांना बसला आहे. अर्सेलर मित्तलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेत सलग सहा वर्षे श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी राहणारे मित्तल यंदा तेथील अव्वल १०० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीच्याही बाहेर फेकले गेले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत मित्तल हे २००६ ते २०११ दरम्यान अव्वल स्थानी राहिले आहेत. तर २०१२ मध्ये त्यांचे स्थान घसरून तिसऱ्या क्रमांकावर आले. २०१३ व २०१४ मध्ये ते अनुक्रमे नवव्या व १३ क्रमांकावर गेले होते. तर ‘संडे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या ताज्या यादीत मित्तल गायबच झाले आहेत. ख्रिस्तो विज हे ६.८ अब्ज डॉलरसह आठ विविध कंपन्यांचे मालक असलेले यादीत वरच्या स्थानावर आहेत.
मित्तल यांचा प्रमुख व्यवसाय असलेल्या पोलादांची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरत आहे. तसेच कंपनीचा (अर्सेलरमित्तल साऊथ आफ्रिका लिमिटेड) स्थानिक – जोहान्सबर्ग सिक्युरिटी बाजारात सूचिबद्ध असलेला समभागही मूल्यऱ्हास नोंदवीत आहे. मित्तल यांनी दक्षिण आफ्रिका सरकारकडे २०१५ च्या सुरुवातीला अर्थसाहाय्याची मागणीही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 4:27 am

Web Title: after 6 years on top lakshmi mittal drops out of south africa rich list list
Next Stories
1 पेट्रोल इंजिन असलेले महिंद्रकडून ‘केयूव्ही१००’ नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहन
2 नफेखोरीने निर्देशांकांत घसरण
3 जर्मन भागीदार अर्गोचा एचडीएफसी लाईफमध्ये हिस्सा ४९ टक्क्य़ांवर
Just Now!
X