ताळेबंद फुगविल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेसच्या संस्थापक रामलिंग राजूसह, त्याचे नातेवाईक व त्यांच्याशी संलग्न कंपन्यांच्या प्रवर्तकांना लबाडीने कमावलेले १,८४९ कोटी रुपये परत करण्याचे ‘सेबी’च्या फर्मानानंतर, आता या घोटाळेबाजांबाबत शेअर बाजारांनी सजगतेचा सदस्यांना आदेश दिला आहे. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांनी तिच्या मंचावर समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या सदस्य दलालांना त्यांच्याद्वारे सत्यमशी संबंधित व्यक्ती, कंपन्यांना व्यवहारांवर बंदीचे पालन केले जावे, असे कळविले आहे.