News Flash

SBI पाठोपाठ HDFC बँकेने दिली ग्राहकांना खुशखबर

यापूर्वी स्टेट बँकेनंही ग्राहकांना दिलासा दिला होता.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पाठोपाठ आता खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीनं ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसीनं व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेनं एमसीएलआरच्या दरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयानं ग्राहकांना दिलासा मिळणार असून आता गृहकर्ज, दुचाकी आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरांमध्ये कपात करण्यात येणार आहे.

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेनं सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात केली होती. तसंच नवे दर ७ डिसेंबरपासून लागू करण्यात आली असल्याची माहिती बँकेनं आपल्या वेबसाईटवरून दिली आहे. यापूर्वी स्टेट बँकेने एका वर्षासाठी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. १० डिसेंबरपासून स्टेट बँकेचे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेचा एमसीएलआर ८ टक्क्यांवरून ७.९० टक्क्यांवर आले आहे.

कमी होणार ईएमआयचा भार

एचडीएफसीच्या या घोषणेनंतर ग्राहकांवरील ईएमआयचा भार थोडा कमी होणार आहे. बँकेच्या या निर्णयानंतर ईएमआयमध्ये ०.१५ टक्क्यांची कपात होणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या पार पडलेल्या बैठकीत व्याज दरात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी रिझर्व्ह बँकने सुरू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये १.३५ टक्क्यांची कपात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 11:22 am

Web Title: after sbi hdfc bank reduces rate of interest affect on emi jud 87
Next Stories
1 ‘मिलेनिअल’नी ‘ईएलएसएस’चाच विचार का करावा?
2 म्युच्युअल फंड मालमत्ता विक्रमी
3 देशातील पहिला कंपनी रोखे ईटीएफ सज्ज
Just Now!
X