09 March 2021

News Flash

एअर इंडियाचाही मिहान प्रकल्पात; आरआयटीईएसशी सहकार्य

याबाबतच्या करारावर मंगळवारी उभय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

वाहतूक पायाभूत सेवा क्षेत्रात मार्गदर्शन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा हातभार लागण्यासाठी एअर इंडियाने आरआयटीईएस लिमिडेटबरोबर सहकार्य करार केला आहे. याबाबतच्या करारावर मंगळवारी उभय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. याचा लाभ एअर इंडियाला नागपूर (मिहान) येथील विमान देखभाल व दुरुस्ती केंद्राच्या विकासाकरिता होणार आहे.
एअर इंडिया अमेरिकेतील विमान तयार करणारी कंपनी बोइंगबरोबर हे केंद्र विकसित करत आहे. या भागातील बांधकाम, हवाई माल वाहतूक केंद्र आदींसाठी एअर इंडियाला या सहकार्याचा लाभ होईल. याबाबतचा आराखडा १५ एप्रिलपर्यंत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. या केंद्रासाठी १० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. आरआयटीईएस लिमिटेड ही पूर्वाश्रमीची रेल इंडिया टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सव्‍‌र्हिसेस सार्वजनिक कंपनी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2015 1:34 am

Web Title: air india coordinate rites for mihan project
टॅग : Mihan Project
Next Stories
1 राज्य सहकारी बँकेचे प्रमोद कर्नाड ‘उत्कृष्ट सीईओ’
2 ‘उत्सवी योजनां’चा लाभ; वाहन विक्रीत वाढ
3 फोक्सवॅगनकडून ३.२३ लाख सदोष वाहने अखेर माघारी
Just Now!
X