25 November 2020

News Flash

एअर एशिया इंडियाची दुसरी झेपही दक्षिणेतूनच

भारताच्या हवाई सेवेत झेपावणाऱ्या एअर एशिया इंडियाचे दुसरे उड्डाण दक्षिणेतीलच कोचीसाठी होणार आहे. कंपनी बंगळुरूतून कोचीसाठी आपली दुसरी विमानसेवा सुरू करेल.

| June 17, 2014 10:17 am

भारताच्या हवाई सेवेत झेपावणाऱ्या एअर एशिया इंडियाचे दुसरे उड्डाण दक्षिणेतीलच कोचीसाठी होणार आहे. कंपनी बंगळुरूतून कोचीसाठी आपली दुसरी विमानसेवा सुरू करेल.
एअर एशिया इंडियाचे कोचीसाठी २० जुलैला उड्डाण होणार असून, त्यासाठी अवघा ५०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम प्रोत्साहनपूरक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
बंगळुरू-कोची व परतीच्या प्रवासासाठी कंपनीने तिच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी सुरू केली असून, ती २२ जूनपर्यंत असेल. २० जुलै ते २५ ऑक्टोबरदरम्यानच्या प्रवासासाठी ती असेल. कोचीसाठी २० जुलैला उड्डाण; ५०० रुपये तिकीटमाफक दरातील देशांतर्गत हवाई प्रवासी सेवेत दाखल झालेली एअर एशिया इंडिया ही चौथी कंपनी आहे. टाटा समूहाबरोबरच्या भागीदारीतील मूळच्या मलेशियाच्या एअर एशियाच्या भारतीय व्यवसायास गेल्याच आठवडय़ात प्रारंभ झाला. यावेळी कंपनीने एक हजार रुपयांपेक्षा कमी दर आकारत बंगळुरू ते पणजी (गोवा) ही सेवा सुरू केली. कंपनीचे दर स्पर्धकांपेक्षा ३५ टक्के कमी असल्याचा दावा एअर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य यांनी यापूर्वीच केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2014 10:17 am

Web Title: air india second flying again from south
टॅग Business News
Next Stories
1 किफायती घरांच्या निर्मितीच्या टाटांच्या क्षेत्रात ‘महिंद्र’चाही प्रवेश
2 भूतानबरोबरचा भारतीय व्यापार
3 अन्नधान्यांच्या किमती कडाडल्याने महागाईचा घाऊक भडका
Just Now!
X