एअरटेल आणि नेटफ्लिक्सने सोमवारी भारतातील भागीदारीचा विस्तार करण्याची घोषणा केली. याद्वारे निवडक ग्राहक एअरटेल पोस्टपेड आणि व्ही-फाइबर होमचे नेटफ्लिक्स ३ महिन्यासाठी मोफत मिळवू शकतील.
यानुसार, ३ महिन्यानंतर एअरटेल पोस्टपेड आणि व्ही-फाइबर होम त्यांच्या एअरटेल बिलाचा वापर करून त्यांच्या नोंदणीसाठी पैसे भरू शकतात. निवडक एअरटेल योजनांचे ग्राहक नेटफ्लिक्समध्ये ‘साइन अप’ करण्यास सक्षम असतील आणि एअरटेल टीव्ही अॅप आणि माय एयरटेल अॅप्लिकेशनद्वारे जबाबदार पद्धतीने तीन महिन्याच्या बक्षीशीचा लाभ घेतील.
भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल म्हणाले, या भागीदारीद्वारे आम्ही नेटफ्लिक्सशी आमचे रणनीतिक नातेसंबंध विस्तारण्यात आनंददायी आहोत. स्थानिक आणि वैश्विक अशा दोन्ही प्रकारच्या सामुग्रीच्या वाढीसाठी स्वस्त उच्च गती डेटा सेवा आणि वाढणाऱ्या स्मार्ट साधनांनी प्रचंड व्यापक संधी निर्माण केली आहे. आम्ही या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि ग्राहकांचा आनंद देत राहण्यासाठी नेटफ्लिक्स सह कार्यरत झाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 1:34 am