News Flash

बँकांना लाभांश वितरणास मुभा

सहकारी बँकांच्या भागधारकांना दिलासा

(संग्रहित छायाचित्र)

करोना साथ प्रसारानंतर लागू टाळेबंदीमुळे व्यापारी बँकांची अर्थस्थिती विस्कळीत होऊ नये म्हणून लाभांश वितरणावर टाकलेले बंधन रिझर्व्ह बँके ने अखेर मागे घेतले आहे. परिणामी वाणिज्यिक बँकांसह देशातील सहकारी बँकांच्या भागधारकांना गेल्या वित्त वर्षासाठीचा लाभांश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

व्यापारी बँकांसह सहकारी बँकांना आता ५० टक्यांपर्यंत लाभांश भागधारकांना वितरित करता येईल. बँकांवरील याबाबतच्या निर्बंधाचा वेळोवेळी लोकसत्ताने पाठपुरावा केला होता. लाभांशाबरोबरच सभासदाच्या भाग भांडवलाबाबतही मर्यादा होती.

भागधारकांना लाभांश वितरित करून बँकांच्या अर्थस्थितीवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँके ने ४ डिसेंबर २०२० ला बंधन घातले होते. यामुळे बँकांना वित्त वर्ष २०१९-२० चा लाभांश बँके च्या भागधारकांना मिळाला नाही. यामुळे भागधारकांच्या उत्पन्नासह बँकेच्या सभासद संख्येवरही परिणाम झाला. वेळोवेळी हे बंधन मागे घेण्याबाबत रिझव्र्ह बँके कडे मागणी करण्यात आली होती. सरकारी पाठबळ असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांना यामुळे अडचण नव्हती. मात्र सहकारी बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होत होता.

रिझर्व्ह बँके ने याबाबतच्या सर्व व्यावसायिक आणि सहकारी बँकांना दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोविड -१९ च्या देशात असलेल्या दुस?ऱ्या लाटेमुळे सुरू असलेल्या अनिश्चिाततेच्या पाश्र्वभूमीवर बँकांनी आर्थिकदृट्या लवचिक राहण्याची आणि कृतिशीलतेने भांडवल वाढवण्याची तसेच त्यांचे संवर्धन करण्याची  निर्णायकता आहे. अनपेक्षित नुकसानाविरुद्ध म्हणूनच बँकांना समभागांवर लाभांश देण्याची परवानगी देताना ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या लाभांश जाहीर केलेल्या निकषांचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. लाभांश दिल्यानंतर सर्व बँका त्यांना लागू असलेल्या किमान नियामक भांडवलाची पूर्तता करत राहतील, असेही नमूद केले आहे.

लाभांश जाहीर करताना बँकेच्या सध्याच्या आणि अंदाज केलेल्या भांडवलाच्या बाबतीत लागू भांडवलाची आवश्यकता आणि तरतुदींच्या पर्याप्ततेचा विचार करून निर्णय घेणे ही बँके च्या संचालक मंडळाची जबाबदारी असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बँकांमध्ये १० ते २ काम

महारष्ट्रातील बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहिल, असे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. याबाबत व्यापारी बँकांची संघटना असलेल्या आयबीएने मार्गदर्शक तत्वे जारी के ली आहेत. त्यानुसार, राज्यात येत्या ७ मेपर्यंत बँकांचे कामकाज चार तास असेल. दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्राशिवाय मुंबईत उपनगरीय प्रवास करता येईल, असे पश्चिाम रेल्वेने स्पष्ट केले.

एचडीएफसी बँकेवर चक्रवर्ती अध्यक्ष

एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय अर्थ सचिव अतानु चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बँके चे अपूर्णवेळचे अध्यक्ष म्हणून मे २०२१ पासून तीन वर्षांसाठी कार्यरत असतील. यासह बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी असेल. चक्रवर्ती हे भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:11 am

Web Title: allow banks to distribute dividends abn 97
Next Stories
1 आठवड्याला १० हजार कोटींचा फटका
2 ‘रुपयात लवकरच ७६ खाली घसरण’
3 घरांच्या मागणीतील वाढ टिकाऊ आणि आश्वासक – दीपक पारेख
Just Now!
X