News Flash

करोना व्हायरसमुळे दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर येणार गदा

रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच या विषाणूमुळे आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली आहे.

सध्या संपूर्ण जगासमोर करोना व्हायरसने मोठे आव्हान निर्माण केले आहे. रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच या विषाणूमुळे आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे तसेच काही कंपन्यांनी आपले उत्पादन सुद्धा बंद ठेवले आहे. या करोना व्हायरसमुळे जगातील दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.

योग्य आंतरराष्ट्रीय समन्वय आणि धोरणात्मक उपायोजना केल्या तर बेरोजगारीचा हा आकडा कमी करता येईल असे संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने म्हटले आहे. “COVID-19 अँड वर्ल्ड ऑफ वर्क: इम्पॅक्ट अँड रिसपॉन्सेस” या प्राथमिक विश्लेषण अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कामाच्या ठिकाणी कामागारांना बचावासाठी योग्य सुविधा, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देण्याची मागणी केली आहे.

समाजिक संरक्षण, नोकरी टिकवून ठेवण्याला प्राधान्य आणि छोटया-मध्यम आकाराच्या कंपन्यांना कर सवलत द्यावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केली आहे. आर्थिक धोरणात्मक उपायोजना आणि काही ठराविक आर्थिक क्षेत्रांना आर्थिक मदत करावी असे प्रस्ताव दिले आहेत. २००८ साली जगात आर्थिक मंदी आल्यानंतर आंतरराष्ट्रीय समन्वयातून ज्या धोरणात्मक उपायोजना करण्यात आल्या, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले त्याचा दाखला या अहवालात देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 2:28 pm

Web Title: almost 25 million jobs could be lost globally due to coronavirus says un body dmp 82
Next Stories
1 शेअर बाजार सावरेना; करोनाच्या भीतीनं पडझड सुरूच
2 इएलएसएस : कर बचत आणि संपत्ती निर्माती योजना
3 भांडवली बाजार आणखी तळात ; सेन्सेक्स, निफ्टीची तीन वर्षांतील मोठी पडझड
Just Now!
X