थॉमस कूक (इंडिया) लिमिटेड भारतातील आघाडीच्या एकात्म पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरवणाऱ्या कंपनीने खास महाराष्ट्रीय पर्यटकांसाठी विशेष टूर योजना सादर केल्या आहेत. यानुसार बुकिंगच्या कालावधीत पर्यटन करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे महाराष्ट्रातील पर्यटनाचे प्रमाण वाढत असल्याने या उगवत्या बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी कंपनीचा सध्या ‘रोड शो’ही सुरू आहे. कंपनीने महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा जिल्ह्य़ांतील प्रादेशिक ग्राहकांचा सखोल अभ्यास यासाठी केला. कंपनीच्या या योजनेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पर्यटनाबरोबर प्रवास दर, खानपान सेवा शुल्क आदी सवलतीत देऊ केले आहे.
याबाबत कंपनीच्या लिजर ट्रॅव्हल (आऊटबाऊण्ड) प्रॉडक्ट्स, ऑपरेशन्स आणि टूर व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि प्रमुख शिबानी फडकर म्हणाल्या, आम्हाला मराठी बाजारपेठेकडून भक्कम पाठिंबा मिळत आहे आणि संभाव्य ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. हे लक्षात घेता कंपनीतील उत्पादन तज्ज्ञांनी खास पॅकेज तयार केली आहेत. ती भाषा, जेवण या महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श करतात. अनेक भारतीय पर्यटकांसाठी पर्यटन ही संकल्पना हव्याशा स्वप्नासारखीच असते. यासाठी टूरमध्ये मराठी बोलणारे व्यवस्थापक, मार्गदर्शक आहेत.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर