अ‍ॅमेझॉन या भारतातील सर्वात मोठय़ा ई-कॉमर्स कंपनीच्या वास्तुभांडाराचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या हस्ते नुकतेच भिवंडी येथे झाले. यावेळी अ‍ॅमेझॉन डॉट इनचे संचालक अखिल सक्सेना उपस्थित होते.
अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.चे हे भारतातील सातवे वास्तूभांडार आहे. अ‍ॅमेझॉन हे सर्वात मोठे वस्तुभांडार असून २ लाख ३० हजार चौरस फूटाच्या क्षेत्रफळात हे वास्तूभांडार विस्तारलेले आहे. भिवंडीस्थित या वास्तूभांडाराची १० लाख घनफूट साठवणूक क्षमता आहे.
या भांडारामुळे महाराष्ट्रातील हजारो लघु – मध्यम उद्योजकांच्या उद्योगाच्या कक्षा संपूर्ण भारतात रुंदावणार आहे. महाराष्ट्रातील पारंपारिक कापड उद्योगातील आणि स्थानिक हस्तकारागीर, विणकर, कारागीर यांना देखील या वास्तुभांडाराचा फार मोठा लाभ होणार आहे.