अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेडरल रिझव्र्हच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या जेनेट येलेन यांनी स्थानिक वेळेनुसार  सकाळी नऊ वाजता शपथ दिली.
ऑक्टोबर महिन्यात फेडच्या अध्यक्षपदाचे अन्य दावेदार लॅरी समर्स यांनी आपली अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मावळते अध्यक्ष बेन बर्नान्के यांच्या वारसदार जेनेट येलेन यांची फेडच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्याचा ठराव मांडला होता. बर्नान्के यांची ३१ जानेवारीची मुदत संपल्यानंतर फेडच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्या घेतील असे तेव्हाच स्पष्ट झाले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात अमेरिकेच्या सिनेटने ५६ विरुद्ध २६ अशा मताधिक्याने हा ठराव मंजूर केला होता. सध्या फेडरल रिझव्र्हच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नस’च्या उपाध्यक्ष असलेल्या येलेन यांच्या हाती अमेरिकेची अर्थव्यवस्था सुरक्षित राहील असा विश्वास वाटल्याने रिपब्लिक पक्षाच्या ११ सिनेट सदस्यांनी पक्षाच्या धोरणाविरुद्ध जात येलेन यांच्या बाजूने मतदान केले होते. ३१ जानेवारी रोजी फेडचे अध्यक्ष बेन बर्नान्के हे त्यांची मुदत संपल्यावर पायउतार झाल्यावर येलेन या फेडच्या उपाध्यक्षपदी कायम होत्या.
१३ ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या येलेन यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात १९७१ ते १९७६ दरम्यान शिकवत. १९७८ ते १९८० या कालावधीत लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये मायक्रो इकोनॉमिक्स या विषयाचे अध्यापन करत होत्या. १९९४ मध्ये फेडमध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून त्या दाखल झाल्या. त्यांच्या सुरुवातीच्या काळात फेडचे तत्कालीन अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांच्याशी त्यांचे धोरणात्मक तीव्र मतभेद होते. नियंत्रणात राहिलेली महागाई बेरोजगारीचा दर कमी करेल या मताच्या त्या होत्या. १९९७ मध्ये िक्लटन प्रशासनात अध्यक्षांच्या आíथक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
फेडच्या अधिकाऱ्यासमोर फेडच्या ‘चेयर वुमन’ म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात त्या म्हणाल्या, ‘आधीच्या अध्यक्षांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जितके प्रयत्न केले. तेवढेच यत्न मीही करेन. माझ्याकडून जे करणे शक्य आहे ते सर्व काही करण्याची ग्वाही मी देते.’ फेडचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन व बेन बर्नान्के यांचे आभार त्यांनी यावेळी मानले. सूत्रे स्वीकारल्यानंतर सिनेटच्या आíथक समितीपुढे ११ फेब्रुवारी, तर बँकिंग समितीपुढे १३ फेब्रुवारी रोजी त्या फेडच्या धोरणात्मक बाबींवर आपली मते मांडणार आहेत.
आधीच्या अध्यक्षांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जितके प्रयत्न केले. तेवढेच यत्न मीही करेन. माझ्याकडून जे करणे शक्य आहे ते सर्व काही करण्याची ग्वाही मी देते. फेडचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन व बेन बर्नान्के यांचे मी आभार मानते.