बुधवारपासून सुरू होणाऱ्या भागविक्री प्रक्रियेतून जमा होणाऱ्या रकमेपैकी तीन चतुर्थाश रक्कम रिलायन्स समूह कर्जफेडीकरिता उपयोगात आणणार आहे.

बाजार भांडवलाबाबत अव्वल असलेल्या समूहाची महत्वाकांक्षी हक्कभाग विक्री प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. या माध्यमातून कं पनी ५३,१२५ कोटी रुपये उभे करणार आहे. पैकी ३९,७५५.०८ कोटी रुपये समूहावरील कर्जफेडीकरिता अमलात आणले जातील, असे कंपनीने स्पष्ट केले. हक्कभाग विक्री प्रक्रिया ३ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. याद्वारे ५३,०३६.१३ कोटी रुपये मिळण्याची कंपनीला आशा आहे.

समूहावरील कर्ज येत्या २०२१ पर्यंत कमी करण्यासाठी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्स मध्ये फेसबुकसह तीन कंपन्यांनी नुकतीच गुंतवणूक केली आहे.