प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी शनिवारी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. दिवाळखोरीच्या प्रक्रियेतंर्गत लवकरच रिलायन्स कम्युनिकेशनच्या संपत्तीचा लिलाव होणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.

छाया विरानी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनी सुद्धा कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सने दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या आरकॉमने मागच्यावर्षी याच तिमाहीत १,१४१ कोटीचा फायदा कमावला होता. सध्या शेअर बाजारात आरकॉमच्या शेअरचा भाव ५९ पैसे आहे.