शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडाची वार्षकि यादी म्युच्युअल फंड संशोधन करणाऱ्या आय फास्ट इंडियाने नुकतीच प्रकाशित केली. या यादीची अद्यावत स्थिती दर सोमवारच्या ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मध्येही प्रसिद्ध होते. या शिफारसीमागील कारणे व मागील एका वर्षांच्या म्युच्युअल फंडाच्या कामगिरीबाबत सांगताहेत आय फास्ट इंडियाच्या संशोधन प्रमुख डॉ. रेणू पोथेन झ्र्

  • सध्याच्या व भविष्यातील रोखे व शेअर बाजाराबाबत काय सांगाल?

मागील एका वर्षांत रोखे व शेयर बाजाराने मोठे चढ उतार अनुभवले. जागतिक बाजारपेठेत जिन्नसांच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मोदी लाटेवर स्वार असलेला शेयर बाजार मार्च २०१४ पश्चात गडगडला. याचा परिणाम म्युच्युअल फंडाच्या परताव्याच्या दारावर झाला. येत्या आíथक वर्षांत बाजार थोडय़ा अधिक प्रमाणात चढ-उतार अनुभवेल.

केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणात रचनात्मक बदल करण्याचे धोरण अवलंबले असून रिझव्‍‌र्ह बँकेची धोरणे ही महागाईला वेसण घालणारी आहेत. सध्या आíथकबाबींवर खूप सकारात्मक दृष्टीकोन नसला तरी येत्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत आम्ही खूपच आशावादी आहोत.

  • या वर्षीच्या यादीत तुम्ही शिफारस प्राप्त फंडांची संख्या ५० वरून ५५ केलीत. ही वाढ करण्यामागची नक्की कारणे काय आहेत?

आम्ही २००९ पासून दरवर्षी आमच्या शिफारसी प्रसिद्ध करीत आहोत. सुरवातीला अर्ध वार्षकि व २०११ पासून वार्षकि यादी प्रसिद्ध करीत आहोत. या वर्षी प्रसिद्ध झालेल्या यादीत आम्ही शिफारस प्राप्त म्युच्युअल फंडाची संख्या ५० वरून वाढवत ती ५५ पर्यंत नेली. आम्ही जेव्हा या यादीला अंतिम स्वरूप देत होतो तेव्हा आम्हाला असे आढळले की, अनेक फंड हे शिफारस प्राप्त योग्यतेचे असूनही केवळ शिफारस प्राप्त म्युच्युअल फंडांची संख्या ५० असल्याने जे फंड यादीत स्थान मिळवू शकत नाहीत त्यांच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आम्ही या वर्षांपुरती ही संख्या ५५ करण्याचे ठरविले. फंडांची कामगिरी बघून ही संख्या कायम ठेऊ किंवा कमी करू.

  • मागील वर्षी तुमच्या यादीतून अनेक फंडांची गच्छंती ही धक्कादायक होती. या वर्षीच्या असे काही घडले का?

दरवर्षी एखादा फंड धक्का देत यादीतून बाहेर जात असतो. या वर्षी २०१२ पासून आमच्या यादीत स्थान मिळविलेला ‘मिरे असेट इंडिया ओपोच्युनीटीज फंड’ या फंडाने आमच्या यादीतून स्थान गमावले. मागील वर्षी यादीतून बाहेर गेलेला ‘एसबीआय इमìजग बिझनेसेस फंड’ या फंडाचे पुन:र्गमन झाले. एकदा यादीचे निकष ठरले की कोणी तरी बाहेर जाणार नवीन कोणी तरी यादीत स्थान मिळविणार हे घडतेच. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, ज्यांची एसआयपी मिळविलेला ‘मिरे असेट इंडिया ओपोच्युनीटीज फंडात’ सुरू आहे त्यांनी ती बंद करावी. या फंडाचे निधी व्यवस्थापक निलेश सुराणा यांची कामगिरी गुंतवणूकदारांना निश्चित केलेल्या परिघात गुंतवणूक करून परतावा देणारी असल्याने त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

  • कोणत्या निधी व्यवस्थापकाच्या मागील वर्षांतील कामगिरीचा तुम्हाला विशेष उल्लेख करायला आवडेल?

निधीव्यवस्थापन हे बहुतांशरित्या  पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते. आम्हाला या क्षेत्रातील एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सोहिनी अंदानी याची मागील वर्षांतील कामगिरी विशेष कौतुकास्पद वाटते. योग्य समभागांची निवड, अव्वल विश्लेषकांची टीम व भांडवलाची सुरक्षितता या तीन गोष्टींमुळे एसबीआय मँग्नम मिडकॅप व एसबीआय ब्ल्युचीप या फंडाची कामगिरी विशेष उल्ल्खानीय झाली आहे.

अनेक फंड हे शिफारस प्राप्त फंडांची कामगिरी बघून ही संख्या कायम ठेवली जाते अथवा कमी-अधिक केली जाते. दरवर्षी एखादा फंड धक्का देत यादीतून बाहेर जात असतो. तर काही फंडाचे पुन:र्गमन होत असते.

योग्यतेचे असूनही केवळ शिफारस प्राप्त म्युच्युअल फंडांची संख्या ५० असल्याने जे फंड यादीत स्थान मिळवू शकत नव्हते. अशांवर अन्याय होतो. म्हणून तूर्त ही संख्या ५५ करण्याचे ठरविले.

एकदा यादीचे निकष ठरले की कोणी तरी बाहेर जाणार व नवीन कोणी तरी यादीत स्थान मिळविणार हे घडतेच. म्हणून फंडातून गुंतवणूकच काढून घ्यावी, असे नव्हे.