नव्या नियुक्तीबाबत फंड वर्तुळात चर्चा
युटीआय म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणूक विभागाचे प्रमुख व युटीआय मिड-कॅप युटीआय इक्विटी फंड यासारख्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देणाऱ्या योजनांचे निधी व्यवस्थापक अनुप भास्कर यांनी आपल्या आठ वर्षांच्या युटीआय म्युच्युअल फंडातील सेवेनंतर नोकरीचा राजीनामा दिला आहे.
युटीआय म्युच्युअल फंडाची आघाडीची योजना असलेल्या युटीआय इक्विटी ऑपोरच्युनीटी या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. युटीआय इक्विटी ऑपोच्र्युनिटी या फंडाची मालमत्ता ३१,८०० कोटी रुपये आहे. एकूण २३ योजना मिळून युटीआय म्युच्युअल फंडाच्या निम्म्या समभाग मालमत्तेचे ते युटीआय म्युच्युअल फंडात १.४५ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहात होते.
अनुप भास्कर यांनी युटीआय म्युच्युअल फंडाचे माजी व्यवस्थापकीय संचालक यु. के. सिंन्हा यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी म्हणून काम पाहिले होते. त्यांची या पदावर कायमतत्वावर नेमणूक न करता सरकारने युटीआय म्युच्युअल फंडाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी लिओ पुरी यांची नेमणूक केली होती.
अनुप भास्कर यांची म्युच्युअल फंड वर्तुळात एक अत्यंत यशस्वी निधी व्यवस्थापक म्हणून ओळख आहे. एकूण २९ वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव असलेले अनुप भास्कर हे युटीआय म्युच्युअल फंडाचे जेष्ठ निधी व्यवस्थापक या नात्याने ते अनेकदा विविध मंचावर युटीआय म्युच्युअल फंडाचे प्रतिनिधित्व करीत असत.
युटीआय म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी अनुप भास्कर यांनी सुंदरम म्युच्युअल फंड ब्रिक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस श्रीराम फायनान्शिअल सर्व्हिसेस व टेम्पल्टन म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक व्यवस्थापनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या होत्या.
अनुप भास्कर यांच्या राजीनाम्याला युटीआय म्युच्युअल फंडाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. अनुप भास्कर हे एका बँकेला नव्याने म्युच्युअल फंड सुरु करण्यास सेबीने परवानगी दिलेल्या म्युच्युअल फंडात दाखल होणार की आधीपासून अस्तित्वास असलेल्या व नव्याने बँकिंग व्यवसायास परवानगी मिळालेल्या आíथक सेवा समूहाच्या म्युच्युअल फंडात दाखल होणार या बाबत म्युच्युअल फंड वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अनुप भास्कर हे युटीआय म्युच्युअल फंडाच्या अव्वल परतावा देणारया काही योजनांचे निधी व्यवस्थापक होते. साहजिकच त्यांच्या राजीनाम्याने गुंतवणूकदार चिंतीत होणे साहजिकच आहे. आम्ही ते व्यवस्थापक असलेल्या युटीआय लॉजेस्टीक व ट्रान्सपोर्टेशन फंड व युटीआय इक्विटी फंड यांची गुंतवणुकीसाठी शिफारस केली होती. त्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी गुंतवणूकदारांनी आपल्या ‘सिप’ सुरूच ठेवाव्यात.
-रेणू पोथेन, फंड सुपरमार्ट डॉटकॉमच्या म्युच्युअल फंड संशोधक प्रमुख.