08 July 2020

News Flash

युक्रेन तणाव नरमल्याने निर्देशांकांची मोठी उसळी

रशिया आणि युक्रेन यांच्या सीमांवरील युद्धजन्य तणाव निवळत असल्याचे दिसल्याने मंगळवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. परिणामी सेन्सेक्सने विद्यमान वर्षांतील दुसरी मोठी झेप मंगळवारी

| March 5, 2014 04:28 am

रशिया आणि युक्रेन यांच्या सीमांवरील युद्धजन्य तणाव निवळत असल्याचे दिसल्याने मंगळवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. परिणामी सेन्सेक्सने विद्यमान वर्षांतील दुसरी मोठी झेप मंगळवारी नोंदविली.
या युद्धजन्य परिस्थितीने भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमध्ये विदेशी वित्ताच्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम अंदाजण्यात आला होता, त्याची चुणूक म्हणून सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड दिसून आली. आज मात्र या वातावरणाने कलाटणी घेतली आणि विदेशी वित्तसंस्थांकडून बाजारात उमदी खरेदी दिसून आली. मध्यान्हीला खुल्या झालेल्या युरोपीय बाजारातील सकारात्मक वातावरणाने या खरेदीला आणखी स्फुरण चढले. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी प्रत्येकी सव्वा टक्क्य़ांच्या दमदार उसळीवर विश्राम घेतला. वस्तुत: सेन्सेक्सची २६३ अंशांची उसळी विद्यमान वर्षांतील दुसरी मोठी झेप ठरली. या आधी १३ जानेवारी २०१४ ला सेन्सेक्स ३७५ अंशांनी उसळला होता. निफ्टी निर्देशांकाने दिवसात ६,३०० या महत्त्वपूर्ण पातळीपल्याड मजल मारली. मात्र दिवसाच्या सांगतेपर्यंत हा स्तर निर्देशांकाला सांभाळता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2014 4:28 am

Web Title: another big leap of sensex
Next Stories
1 गुंतवणूक, दानधर्म आणि कर कार्यक्षमताही!
2 आयात-र्निबधाने हैराण सराफांची १० मार्चला देशव्यापी संपाची हाक
3 सोने आयातीवरील बंधने सैल करण्यास वाणिज्य मंत्रालयाची अनुकूलता
Just Now!
X