अमेरिकी मोबाइल फोन निर्मात्या अ‍ॅपलचा व्यवसाय डिसेंबर २०२० अखेरच्या तिमाहीत दुप्पट झाल्याची माहिती कंपनीचे मुख्याधिकारी टिम कूक यांनी गुरुवारी दिली. कंपनीच्या ऑनलाईन दालनाच्या माध्यमातून झालेल्या फोनविक्रीमुळे हे यश मिळाल्याचेही ते म्हणाले.

कंपनीने डिसेंबर २०२० अखेर जागतिक स्तरावर विक्रमी, १११.४० अब्ज डॉलरची महसूल नोंद केली असून यात २१ टक्के वाढ झाली आहे. कंपनीची आंतरराष्ट्रीय विक्री ६४ टक्क्य़ांनी झेपावली आहे.