11 August 2020

News Flash

अ‍ॅपलचा चीनला मोठा झटका; आणखी एका स्मार्टफोनच्या उत्पादनाला भारतात सुरुवात

पुढील काळात भारतातून निर्यात करण्यावरही कंपनीचा विचार

(File Photo - AP)

गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलसाठी काम करणाऱ्या फॉक्सकॉन या कंपनीनंही भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अ‍ॅपलंनं चीनला आणखी एक मोठा झटका दिला आहे. अ‍ॅपलनं आपला फ्लॅगशिप फोन iPhone11 च्या भारतात उत्पादनाला सुरूवात केली आहे. पहिल्यांदाच अ‍ॅपल भारतात आपल्या मोबाईलच्या टॉप मॉडेलचं उत्पादन करत आहे. चेन्नईमधील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये या फोनच्या उत्पादनाला सुरूवात झाली आहे. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेला बळ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या मोबाईलचं उत्पादन टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती या क्षेत्रातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसंच पुढील काळात iPhone11 च्या निर्यातीवरही विचार होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. सध्या अ‍ॅपलनं iPhone11 च्या किंमतीत कोणतीही कपात केली नाही. सध्या चीनमध्येच तयार झालेल्या मोबाईल फोनची विक्री भारतात करत असल्यानं त्याच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. देशांतर्गत उत्पादन सुरू झाल्यानंतर तब्बल २२ टक्के आयात शुल्काची बचत होणार आहे.

आणखी एका फोनच्या उत्पादनाचा विचार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅपल बंगळुरूनजीक असलेल्या विस्ट्रॉन प्रकल्पात आपल्या नव्या iPhone SE च्या उत्पादनावर विचार करत आहे. तसंच iPhone SE चं यापूर्वीच्या मॉडेलचं उत्पादन या ठिकाणी करण्यात आलं होतं. परंतु नंतर ते मागे घेण्यात आलं. सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इंन्सेंटिव्ह योजनेचा फायदा घेण्यासाठी अ‍ॅपल भारतात आपलं उत्पादन वाढवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि अमेरिकेतील संबंध अधिक ताणले गेले आहेत. या उचललेल्या पावलामुळे चीनवरील अवलंबत्व कमी होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

iPhone11 ची सर्वाधिक विक्री

अ‍ॅपलनं सप्टेंबर महिन्यात तीन नवे मॉडेल्स लाँच केले होते. त्यापैकी iPhone11 ची सर्वाधिक विक्री झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत तयार झालेले मॉडेल्सही अनेक दुकानांपर्यंत पोहोचले आहेत. सध्या iPhone XR चं उत्पादन फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये तर iPhone 7 चं उत्पादन विस्ट्रॉन प्लांटमध्ये करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:55 pm

Web Title: apple iphone 11 productions starts in india foxconn thinking of exporting products jud 87
Next Stories
1 बँकांपाठोपाठ, विमा, नाबार्ड, रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांनाही भरीव वेतनवाढीची आस
2 ‘सेन्सेक्स’कडून पुन्हा ३८,०००चा गड सर
3 किराणा-स्वारस्य
Just Now!
X