‘अ‍ॅपल’च्या नवीन फोनचे आज अनावरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : आयफोन ८ आणि ८ प्लसची नवलाई संपली नाही, तोच त्याची नवी सुधारीत श्रेणी अ‍ॅपल घेऊन येत आहे.  बुधवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता कॅलिफॉर्नियातील अ‍ॅपलच्या स्टिव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण केले जाईल.

एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड आणले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे हे आयफोन डय़ुएल सिम सुविधेसह येत आहेत.

तीनही आयफोनचे डिस्प्ले मोठे ेअसतील. यात ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससीसोबतच, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस या नावाने हे आयफोन आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येत आहे. आयओएस १२ चिपसेटच्यासोबत हे सगळे आयफोन असतील.

या नवीन आयफोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अ‍ॅपलची ओळख असलेले फिंगरप्रिंट सेन्सर त्यात नसेल. त्याजागी फेस आयडी सेन्सर असेल. अ‍ॅपलचे आयफोन पहिल्यांदाच डय़ुएल सिममध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅपलमध्ये असणारे प्रोसेसर आणि रॅम हे आधीच्या आयफोनच्या तुलनेत मोठय़ा क्षमतेचे असणार आहेत. आयफोन एक्सएस आणि एक्सएस प्लस याची रॅम चार जीबी किंवा त्यापेक्षा मोठय़ा क्षमतेची असेल.

अ‍ॅपल वॉचची चौथी श्रेणीही प्रस्तुत होत आहे. आधीच्या अ‍ॅपल वॉचपेक्षा मोठी बॅटरी आणि मोठय़ा डिस्प्लेसोबत एलटीई या सुधारीत आवृत्तीसह हे स्मार्ट घडय़ाळ येईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple launch dual sim iphone in india
First published on: 12-09-2018 at 03:09 IST