News Flash

..तर वस्त्रोद्योग क्षेत्रातून निर्यातीत अतिरिक्त ३.५ अब्ज डॉलरची निर्यात वाढ शक्य – टेक्सप्रोसिल

भूमिकेचा जितका आर्थिक सर्वेक्षणामध्ये ठळकपणे उल्लेख आला आहे

ब्रेग्झिटपश्चात ब्रिटन आणि युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार (एफटीए) केला गेल्यास तयार वस्त्र निर्यातीत अतिरिक्त २ अब्ज अमेरिकी डॉलरची भर पडेल तसेच १ लाख इतका वाढीव रोजगार निर्माण होईल. जर तयार वस्त्रासह कापड आणि अन्य संलग्न क्षेत्र जमेस निर्यातीत ३.५ अब्ज डॉलरची वाढ दिसेल.

म्हणूनच अर्थसंकल्पात या उद्योगक्षेत्रासाठी करण्यात आलेल्या वृद्धीपूरक तरतुदीचा सकारात्मक परिणाम दिसायचा झाल्यास एफटीएबाबत सरकारने तत्परता दाखविण्याची मागणी ‘टेक्सप्रोसिल’ या वस्त्र निर्यातदार संघटनेने केली आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग क्षेत्राला रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने मिळालेला अग्रक्रम उत्साहवर्धक असल्याची प्रतिक्रिया टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष उज्वल लाहोटी यांनी व्यक्त केली. विशेषत: वस्त्रोद्योगातील बहुतांश कंपन्या लघू व मध्यम उद्योग क्षेत्रात येतात आणि क्षेत्रातील कंपन्यांना प्राप्तिकरात अर्थसंकल्पातून दिली गेलेली पाच टक्क्यांची सवलत खूपच दिलासादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि या क्षेत्राची निर्यातीच्या भूमिकेचा जितका आर्थिक सर्वेक्षणामध्ये ठळकपणे उल्लेख आला आहे, तितकी प्रत्यक्ष अर्थसंकल्पात दखल घेतली गेलेली नाही, अशी खंतही लाहोटी यांनी व्यक्त केली. प्रमुख निर्यात बाजारपेठांमधून मंदावलेली मागणी तसेच अमेरिकेसह काही देशांतून देशी उद्योगांना संरक्षणाचा पवित्रा हा आपल्या वस्त्र निर्यातीला बाधा आणणारा ठरत आहे. त्यामुळे ज्या देशांशी अद्याप मुक्त व्यापार करार झालेला नाही, त्यांच्याबरोबर तसा करार करणे आणि तोपर्यंत निर्यातदारांना प्रोत्साहनपर उपाय योजण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

आरोग्यनिगा क्षेत्राला पायाभूत दर्जाचा विचार करावाच लागेल

मुंबई : अनेक गंभीर आजारांच्या देशांतून संपूर्ण निर्मूलनाचा कार्यक्रम आणि वैद्यक शिक्षणात खासगी क्षेत्राच्या अधिकाधिक भागीदारीचा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून व्यक्त केलेला मानस अत्यंत स्वागतार्ह आहे. देशाच्या आर्थिक उत्कर्षांबाबत जे भव्य संकल्प आणि निर्धार व्यक्त केला जात आहे, त्या तुलनेत आरोग्याच्या बाबतीत देशात खूप विषम स्वरूपाचे चित्र दिसून येते. आरोग्यनिगा क्षेत्राला ‘पायाभूत उद्योगा’चा दर्जा दिला गेल्यास या कठीण भासणाऱ्या आव्हानांचा सामना समर्थपणे केला जाऊ शकेल, असा विश्वास हिंदुजा समूहाचे अध्यक्ष ए. पी. हिंदुजा यांनी व्यक्त केला. सामाजिक-आर्थिक समतोल वृद्धीपथ, अर्थव्यवस्थेचे पारदर्शी  डिजिटलीकरण, करांचा पाया विस्तारण्यावर भर आणि देशात व्यापार-व्यवसाय करण्याच्या प्रक्रियेत सुलभता या महत्त्वांच्या बाबींवर अर्थमंत्र्यांचा प्राधान्यक्रम स्पष्टपणे दिसून येतो, अशी हिंदुजा यांनी पुस्ती जोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:13 am

Web Title: article on textile sector exports
Next Stories
1 अमेरिका, ब्रिटनच्या बँकांचे व्याजदर स्थिर
2 गरिबी निर्मूलनाचा पर्यायी मंत्र
3 भांडवली बाजाराला ‘एच १ बी व्हिसा’ फास!
Just Now!
X