विविध पूर्वनियोजित कार्यक्रमांनिमित्त मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नरिमन पॉइंट येथील ‘योगक्षेम’ या मुख्यालयालाही भेट दिली. या वेळी (डावीकडून) केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया, महामंडळाच्या कार्यकारी अधिकारी उषा संगवण, व्यवस्थापकीय संचालक एस. बी. मैनक, अध्यक्ष एस. के. रॉय व व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. शर्मा उपस्थित होते. महामंडळाचा जीवन विमा क्षेत्रात ८४.४४ टक्के हिस्सा असून गेल्या आर्थिक वर्षांत ७५.३ टक्के उत्पन्न हे नव्या विमा योजनांमधून आले असल्याची माहिती अध्यक्षांनी या वेळी अर्थमंत्र्यांना दिली. तर कंपनीमार्फत होणाऱ्या दाव्यांची पूर्तता ही खासगी जीवन कंपन्यांच्या तुलनेत सरस असल्याची पावती अर्थमंत्र्यांनी या प्रसंगी दिली.