23 October 2018

News Flash

अर्थव्यवस्थेची गती २०१६-१७ मध्ये मंदावल्याची सरकारकडूनही कबुली

परदेशी तसेच देशांतर्गत बिघडलेले वित्तीय गणित जबाबदार

महिनाभरावर येऊ घातलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत वित्त क्षेत्रातील नियामकांची बैठक घेतली.

परदेशी तसेच देशांतर्गत बिघडलेले वित्तीय गणित जबाबदार

परदेशी तसेच देशांतर्गत वित्तीय गणित बिघडल्याने देशाचा आर्थिक विकास मंदावल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. २०१५-१६ मधील ८ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या वित्त वर्षांत विकास दर कमी, ७.१ टक्के राहिल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

परदेशी तसेच देशांतर्गत आर्थिक, वित्तीय घटक या संथ अर्थव्यवस्थेला जबाबदार असल्याचे जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गेल्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात कमी झालेली ढोबळ स्थिर गुंतवणूक, कंपन्यांचा आर्थिक चणचणीचा ताळेबंद, बँकांमधील कर्जाचे कमी प्रमाणातील वितरण याचबरोबर जागतिक स्तरावरही विकास दर रोडावल्याचे कारण अर्थमंत्र्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही नमूद केले असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचेही जेटली म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत असून निर्मिती, वाहतूक, ऊर्जा, ग्रामीण पायाभूत, थेट विदेशी गुंतवणूक या क्षेत्रात कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी वस्तू व सेवा कर प्रणाली योग्य दिशेने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, २०१४-१५ मध्ये ७.५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८ टक्के तर २०१६-१७ मध्ये ७.१ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन नोंदले गेले आहे. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये ते अनुक्रमे ५.७ व ६.३ टक्के राहिले आहे.

First Published on December 30, 2017 1:27 am

Web Title: arun jaitley comment on economy of india 3