News Flash

अश्विनी कुमार ‘आयबीए’चे नवे अध्यक्ष

अश्विनी कुमार यांची ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या (आयबीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे

अश्विनी कुमार ‘आयबीए’चे नवे अध्यक्ष
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील देना बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांची ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या (आयबीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ‘आयबीए’ ही बँक व्यवस्थापन संघटना असून तिच्या २०१५-१६ साठीच्या कार्यकारिणीकरिता अध्यक्ष म्हणून कुमार नियुक्त झाले. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. बँक क्षेत्रातील तब्बल तीन दशकांचा अनुभव असलेले अश्विनी कुमार देना बँकेपूर्वी डिसेंबर २०१० मध्ये कॉर्पोरेशन बँकेत कार्यकारी संचालक होते.

नैना लाल किडवई डिसेंबरमध्ये निवृत्त होणार
मुंबई : ब्रिटिश बँक असलेल्या एचएसबीसीच्या भारतीय व्यवसायातून तब्बल १३ वर्षांनंतर नैना लाल किडवाई या येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. एचएसबीसी इंडियाच्या अध्यक्षा असलेल्या किडवाई या २००२ पासून एचएसबीसी समूहात आहेत. मॉर्गन स्टॅनलेमधून आलेल्या किडवाई यांनी एचएसबीसी सिक्युरिटीज अ‍ॅन्ड कॅपिटल मार्केट या उपकंपनीत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. एचएसबीसी इंडियाच्या त्या २००७ मध्ये मुख्य कार्यकारी तर २००९ मध्ये अध्यक्षा झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 7:29 am

Web Title: ashwani kumar new iba chairman
Next Stories
1 भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला; अमेरिका आणि चीनला टाकले मागे
2 रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदरात कपात
3 अपेक्षेपेक्षा सरस दिवाळी भेट!
Just Now!
X