मालमत्ता व्यवस्थापन ही संकल्पना भारतात पाश्चात्याच्या तुलनेत एक नवीन घटना आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती तिथे रुजली असून आता त्याचे महत्व भारतीयांना कळू लागलेले आहे. भारताय या सेवांच्या विस्तारासाठी अद्यापही एक दीर्घ पल्ला गाठावा लागणार आहे. ही संकल्पना प्रामुख्याने संचार, पायाभूत सुविधा, स्वच्छता आदींची संबंधित आहे.
मालमत्ता व्यवस्थापन हे निवासी मालमत्ता व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे आणि एखाद्या आस्थापनाची एकंदर कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे व्यवस्थापन एक महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय अजूनही नवजात अवस्थेत आहे. बदलत्या व्यावसायिक गरजांच्या अनुषंगाने आणि एका नवीन ‘लँडस्केप’च्या उदयासह, स्थावर मालमत्ता आणि त्यांच्या सुविधा व्यवस्थापकीय दिशेच्या पद्धतीला गेल्या दशकात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आपला मुख्य व्यवसाय आणि त्यातील क्रियाशीलता यांच्यावर लक्ष केंद्रित करून कंपन्या दीर्घावधीत सर्वोत्तम परिणाम उत्पादन मिळू शकतील व असे संबंधित भागात उत्तम यश प्राप्त करू शकतात. त्याची सर्वोत्तम भागीदारी ही मूळापासून काम करण्यामुळेच सिद्ध होऊ शकते. मागील अनेक वर्षांपासून आíथक विकास झपाटय़ाने होत असल्याचे दिसून येते. या वाढीत भारतात निवासी मालमत्तेने वितरण आणि सर्वोत्तम व्यवस्थापनाची जागतिक मानके गाठली आहे. भारतातील कारभारातील वातावरणात त्यामुळे अनुकूलनीय बदल सहजपणे झाले आहेत.
निवासी जागेची मागणी, उपलब्धता, वेळ आणि गुणवत्ता यांच्यात मोठे बदल घडून आले आहेत. बदलत्या काळानुसार त्यांचा दर्जा, अव्वलपणा, उत्तम संरचना, त्यांच्या गरजा भागवण्याच्या बाबतीत अगदी सुसूत्रता आलेली आहे. निवासी इमारतींचे देखणेपण, त्याच्यातील प्राथमिकता यांनी विशेष महत्व मिळवलेले आहे. कालानुरूप या इमारतींचे नूतनीकृत व मानदंड यांनादेखील परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी सुधारणांवर भर दिला आहे.
मालमत्ता व्यवस्थापन ही संकल्पना भारतात पाश्चात्याच्या तुलनेत एक नवीन घटना आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती तिथे रुजली असून आता त्याचे महत्व भारतीयांना कळू लागलेले आहे. भारताय या सेवांच्या विस्तारासाठी अद्यापही एक दीर्घ पल्ला गाठावा लागणार आहे. ही संकल्पना प्रामुख्याने संचार, पायाभूत सुविधा, त्यांची अंमलबजावणी, देखभाल, उत्तम लँडस्केपिंग, बागकाम, सुरक्षा, स्वच्छता, इमारतीची जमिनीवर तसेच आतील देखभाल, खानपान सुविधा आदींची संबंधित आहे. सामान्यत: ज्या गरजा या ठिकाणच्या लोकांना आवश्यक आहेत, त्या पुरवण्यासाठी कटिबद्ध राहणारे हे व्यवस्थापन आहे.
पुरवण्यात येणा-या सेवांचे स्वरुप आणि अनुभव यांच्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक पातळीवर काळजी घेणे व त्याला अधिकाधिक दर्जेदार करण्याचे शास्त्र असून ते योग्य प्रकारे साधले गेले पाहिजे. प्रत्येक उपकऱ्णांची व सेवांची श्रेणी व त्यानुसार जबाबदारी निश्चित करता आली पाहिजे.
इमारतींच्या गुणवत्तेचा दर्जा राखण्यासाठी त्यांची देखभाल व्यावसायिक पद्धतीने करणे, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विकासकाला प्रत्येक चौरस फूटामागे काही ठराविक रक्कम आकारणे भाग पडते त्यानुसार सामायिक क्षेत्र देखभाल (सीएएम) शुल्क त्याला आकारणे भाग पडते. अनेक विकासकांना आता इमारतींच्या उत्तम देखभालीचे महत्व पटलेले आहे आणि त्यांनी त्यानुसार सीएएमचा आधार घेतलेला आहे. ही पद्धती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मात्र काही ठिकाणी मात्र चच्रेचा विषय होऊ शकते.
सीएएममध्ये वार्षकि देखभाल, इमारतीचे मूल्य, वीज, पाणी यांच्यासाठी निधीची तरतूद करण्याबरोबरच त्यात व्यवस्थापनातील उपकरणांचा, सुरक्षा, तंत्रज्ञ, कीड नियंत्रण आदी खर्च समाविष्ट आहेत. त्याच्यात अधिकाधिक सुसूत्रता व पारदर्शकता नजीकच्या काळात येणार आहे. हिशेबाच्या व’ाांमध्येही या बाबी समाविष्ट होऊन त्याच्या निधीची माहितीदेखील सदनिकाधारकांना मिळू शकेल.
मालमत्ता व्यवस्थापन कार्य योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी स्वत:लाच स्वतची आव्हाने आहेत, असे समजले पाहिजे. संघटितपणे निवासी तसेच किरकोळ स्वरूपाच्या मालमत्तांसाठीही ती अत्यंत महत्वाची आहेत. आधुनिक मालमत्तांच्या बाबतीत रिअल इस्टेटमध्ये या व्यवस्थापनाची अधिक मागणी वाढू लागलेली आहे.

(लेखक ‘शेठ क्रिएटर्स’च्या विपणन व विक्री विभागाचे संचालक आहेत.)