28 September 2020

News Flash

क्रिसिल क्रमवारीत अ‍ॅक्सिस,कॅनरा रोबेको अव्वल

रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात एडलवाईस फंड घराणे अव्वल

संग्रहित छायाचित्र

क्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारीत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात अ‍ॅक्सिस आणि कॅनरा रोबेको फंड घराण्याने बाजी मारली आहे. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात एडलवाईस फंड घराणे अव्वल ठरले आहे.

क्रिसिल प्रत्येक तिमाहीतील फंडांच्या त्या फंड गटातील तुलानात्मक कामगिरीनुसार  फंडाची क्रमवारीत विभागणी करीत असते. एप्रिल-जून २०२० या कालावधीतील कामगिरीनुसार क्रिसिल क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. ‘सीएमएफआर’ म्हणजेच क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंगमध्ये समावेशासाठी मूलभूत निकष निश्चित आहेत. किमान तीन वर्षेपूर्ण केलेल्या आणि गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या (ओपन एंडेड) फंडांचा या क्रमवारीसाठी विचार केला जातो. याव्यतिरिक्त किमान मालमत्ता हादेखील एक निकष आहे.

समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची विभागणी १० फंड गटात, हायब्रीड फंडांची विभागणी तीन फंड गटात तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांची विभागणी १२ फंड गटात करण्यात येते. लार्ज कॅप गटात अ‍ॅक्सिस ब्लू चिप आणि कॅनरा रोबेको ब्लू चिप अव्वल ठरले आहेत. मल्टी कॅप गटात कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड आणि पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाइड आणि यूटीआय इक्विटी या फंडांना क्रिसिलने अव्वल मानांकन दिले आहे.

आमच्या फंडांच्या कामगिरीत सातत्य असावे यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून आमचे गुंतवणूकदार वित्तीय उद्दिष्ट गाठू शकतील. अस्थिर परिस्थितीत  क्रिसिल क्रमवारीत आमच्या चार इक्विटी फंडांना अव्वल पत मिळाली आहे, याचा आनंद वाटतो. आमच्या आर्बिटराज आणि बँकिंग पीएसयू डेट फंडांना गटात सर्वोच्च पत मिळाली. अन्य तीन फंडांना सीपीआर -१ पत असून आमच्या प्रयत्नांना ही पावती आहे.

– राधिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एडलवाईस म्युच्युअल फंड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:15 am

Web Title: axis canara robeco tops crisil rankings abn 97
Next Stories
1 सोने ५५ हजार रुपयांपुढे, चांदीची सत्तर हजारी मजल
2 तेजीचे पुनरागमन
3 एचडीएफसी बँकेच्या प्रमुखपदी शशिधर जगदीशन
Just Now!
X