पारंपरिक आयुर्विमा उत्पादनांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जातील. याबाबत विमा सल्लागार समितीने बैठक घेतली आहे. विमा प्राधिकराणासमोर लवकरच ती येतील. जे. हरिनारायण ईर्डाचे अध्यक्ष
व्याजदर कपातीसाठी उचलेले बँकांचे पाऊल कायम
आठवडाभरापूर्वी प्रमुख दरांमध्ये कपात करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत ताबडतोब अनेक बँकांनी त्यांच्या गृह, वाहन कर्जामध्ये घट करून केले. वाणिज्य बँकांचा हा कित्ता अद्यापही कायम आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होताच आयडीबीआयने तर शुक्रवारी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांनीही आधार दर पाव टक्क्याने कमी केले. स्टेट बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, फेडरल बँकांनीही शनिवारी कर्ज व्याजदर कमी केल्यानंतर  सोमवारी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन बँक यांनीही त्याला साद दिली. या दोन्ही प्रमुख बँकांनी त्यांचे आधार दर ०.१५ ते ०.३० टक्क्यांपर्यंत कमी केले. राष्ट्रीयीकृत पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनीही आतापर्यंत आधार दर कमी केले आहेत.
*  इंडियन बँक
कपात ०.३०%
सध्याचा दर १०.५०
नवा दर १०.२०%
अंमलबजावणी ९ फेब्रुवारीपासून
*  ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स
कपात ०.१५%
सध्याचा दर १०.४०%
नवा दर १०.२५%
अंमलबजावणी २५ फेब्रुवारीपासून
* ठेवींवरील व्याजही कमी
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने ठेवींवरील व्याज दरही कमी केले आहेत. यानुसार बँकेच्या एक कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर (३ ते १० वर्षे कालावधीसाठी)ोता ९.१० टक्क्यांऐवजी ९ टक्के व्याजदर लागू होील. पतधोरणानंतर सर्वात प्रथम कर्ज स्वस्त करणाऱ्या आयडीबीआयनेही गेल्या मंगळवारीच ठेवींवरील दर त्याच प्रमाणात कमी केले होते.