22 April 2019

News Flash

Budget 2019 : ४० हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला

(संग्रहित छायाचित्र)

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस पाडत मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पामध्ये बँक आणि पोस्टातील बचतीवरील ४० हजारापर्यंतचे व्याज करतमुक्त केल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही मर्यादा केवळ १० हजार रुपयांची होती.

अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख 53 हजार घरं बांधली
स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
आयुष्मान योजनेमुळे गरीबांचे तीन हजार कोटी रुपये वाचले
आयुष्मान भारत योजनेचा दहा लाख लोकांना लाभ
143 कोटी एलईडी लाईट दिले, 2021 पर्यंत प्रत्येक गावात वीजजोडणी
दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार
2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट खात्यात जमा केले जाणार
12 कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार : पियुष गोयल
पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त
5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्नावर 20 टक्के कर
10 लाखांच्या पुढे उत्पन्नावर 30 टक्के कर
तीन कोटी करदात्यांना नव्या कररचनेचा फायदा होणार
प्रॉव्हिडंट फंड आणि निर्धारित इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास साडेसहा लाखांपर्यंत उत्पन्नावर कर नाही

First Published on February 1, 2019 1:09 pm

Web Title: bank and post office deposits raised from 10000 to 40000 rupees
टॅग Budget 2019