15 October 2019

News Flash

बँकांचे व्यवहार पुन्हा विस्कळीत होणार

विविध कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून दोन दिवसांच्या बंदला सुरुवात होत आहे

कामगारांच्या आजपासूनच्या दोन दिवसांच्या बंदचा फटका बसणार

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविषयक धोरणांना विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी मंगळवारपासून दोन दिवसांच्या बंद पुकारला असून यामध्ये बँकांचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याने आर्थिक व्यवहार पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून दोन दिवसांच्या बंदला सुरुवात होत आहे. कामगारविषयक सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निषेध करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आंदोलनात बँकांच्या संघटना तसेच बँकांचे कर्मचारीही सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बँकांमधील नऊ संघटनापैकी दोनच संघटनांनी मंगळवारपासूनच्या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे स्पष्ट केल्याने बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार नाही, असे स्टेट बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचारी संघटनेने केवळ ८ जानेवारीच्या बंदला आणि तेही पाठींबाच दिल्याने मध्यवर्ती बँकेचे कामकाज सुरू राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मंगळवारपासूनच्या बंदमध्ये इंटक, आयटक, हिंद मजदूर संघ, सिटू, एलपीएफ, सेवा, टीयूसीसी, यूटीयूसी आदी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या संघटनांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विनिलनीकरण विरोधात बँक कर्मचारी, अधिकारी वर्गाने गेल्या महिन्यातही आंदोलन केले होते. लागून येणाऱ्या सुटीदरम्यानच ते झाल्याने डिसेंबरचा शेवटचा संपूर्ण आठवडा विस्कळीत झाला होता.

First Published on January 8, 2019 7:33 am

Web Title: bank employees strike bank employees may go on a two day strike