News Flash

आजपासून बँकांचा संप

तीन दिवस व्यवहार विस्कळीत होणार

| January 31, 2020 01:07 am

(संग्रहित छायाचित्र)

तीन दिवस व्यवहार विस्कळीत होणार

नवी दिल्ली : वेतनवाढीच्या मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थात आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी वाटाघाटी असफल झाल्याने बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप शुक्रवारपासून सुरू होणार असून परिणामी बँकांचे व्यवहार तीन दिवस विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ दोन दिवस संप होणार आहे.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या नेतृत्वाखाली प्रमुख बँक कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी शुक्रवारपासूनच्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. मात्र संपाला लागून रविवारची सुटी असल्याने सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत.

अर्थसंकल्प मांडण्याच्या आदल्या दिवशीच बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. शुक्रवारी संपाच्या पहिल्या दिवशी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे. बँक संघटनांनी २० टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.

दोन दिवसांच्या संपाची घोषणा केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींची सोमवारी मुख्य कामगार आयुक्तांबरोबर बैठक झाली; मात्र तोडगा न निघाल्याने संप कायम राहणार असल्याची माहिती ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी सांगितले.  ‘आयबीए’कडून वेतनवाढीबाबत कोणतेही आश्वासन न आल्याची कर्मचारी संघटनांची तक्रार असल्याचे ‘अखिल भारतीय बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:07 am

Web Title: bank employees to strike today tomorrow zws 70
Next Stories
1 महिन्यातील वायदापूर्तीची अखेर पुन्हा मोठय़ा निर्देशांक घसरणीने
2 टाटांचा टेलिकॉम बिझनेस बंद; तरीही द्यावे लागणार १३ हजार कोटी
3 ‘डीएचएफएल’कडून वाधवानशी संलग्न ७९ कंपन्यांना १२,७७३ कोटींचे घबाड