सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक ऑफ बडोदाने जीवनविमा क्षेत्रातील दोन मुख्य कंपन्यांसोबत म्हणजे मॅक्स बुपा इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत सामंजस्याचा करार केला. विमा क्षेत्राची नियामक संस्था ‘इर्डा’ने जारी केलेल्या नव्या नियमानुसार विमा क्षेत्रात एकाच वेळी दोन कंपन्यांशी बहु-भागीदारी स्वरूपाचे सामंजस्य करणारी बँक ऑफ बडोदा पहिलीच बँक आहे. बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक मयांक के मेहता यांनी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ आशिष मेहरोत्रा तसेच स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. जग्गनाथन यांच्यासोबत दोन स्वतंत्र करार केले. आपल्या सहा कोटींहून अधिक ग्राहकांच्या विमाविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी हे पाऊल असल्याचे मेहता यांनी सांगितले.