आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने ४,२९५ बचत गटांना एकूण ५७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून, महिला सक्षमीकरणाच्या कार्यात राज्यामध्ये बँक अग्रस्थानी राहिली असल्याचे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
वर्ष २०१५-१६ मध्ये देशभरातील १२.८७ लाख बचत गटांना ३०,४२९ कोटी रुपयांचे एकूण अर्थसाहाय्य सर्व बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे. आधीच्या २०१४-१५ सालाच्या तुलनेत त्यात एकंदर ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने राज्यात इतर बँकांच्या तुलनेत महिला सक्षमीकरण कार्यात आघाडी घेतलेली असून ३,४९० बचत गटांना सुमारे ४० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. दारिद्य््रारेषेखालील वर्गासाठी आर्थिक समावेशकता आणि महिला सशक्तीकरण दोन्ही आघाडीवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाकडून तिचा विशेष गौरव करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 22, 2016 8:15 am