बँक ऑफ महाराष्ट्रने कोविड-१९ च्या आपत्कालीन पार्श्वभूमीवर कंपनी, किरकोळ, कृषी क्षेत्रांसाठी निधीची पूर्तता करण्यासाठी योजनांची घोषणा केली आहे.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी सांगितले की, अशा कठीणप्रसंगी आम्ही आमच्या ग्राहक, स्वसहाय्यता गट आणि शेतकऱ्यांबरोबर खंबीरपणे उभे आहोत. कोविड-१९ पार्श्वभूमीवर नव्याने तयार केलेल्या आमच्या या योजनांमुळे आमच्या ग्राहकांच्या आपत्कालीन निधीची गरज सहजतेने पूर्ण होईल, अशी आमची खात्री आहे. आम्ही आमच्या कर्जदारांना कोविड-१९ संसर्गाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या तरलता तफावतीवर मात करण्यासाठी या विशेष कर्ज योजनांचा लाभ घेण्याचा आग्रह करतो.

कंपनी क्षेत्रासाठी कोविड-१९ अस्थायी कर्ज योजना, सध्याच्या गृह कर्जधारकांसाठी तातडीची कोविड-१९ व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) योजना, स्वसहाय्यता गटांना अतिरिक्त आधार देण्यासाठी ‘महाबँक स्वसहाय्यता राहत योजना कोविड-१९’, कृषी आधारित उद्योग/यूनिट्ससाठी कोविड-१९ अंतर्गत तात्पुरती तरलता पुरवण्याच्या उद्दीष्टसाठी महाबँक किसान राहत योजना, शेतकऱ्यांसाठी असलेल्या कोविड-१९ महाबँक किसान राहत योजना सादर करण्यात आली आहे.