सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक)ने कर्जावरील व्याजाचे दर ०.१५ टक्क्याने वाढविले आहेत. नव्या सुधारणेनंतर बँकेचा आधार दर (बेस रेट) वार्षिक १०.४० टक्के असेल. नवा दर २१ एप्रिलपासून लागू होत आहे. यामुळे बँकेकडून नव्याने वितरीत होणारे घरासाठीचे कर्ज, वाहन कर्ज महाग होणार आहेत.
महाबँकेचा यापूर्वीचा आधार दर १०.२५ टक्के होता. रिझव्र्ह बँकेने तिच्या वार्षिक पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर कर्ज व्याजदर वाढविणारी ही पहिली बँक ठरली आहे. अन्य बँकांकडून हा कित्ता लवकरच गिरविला जाण्याची शक्यता आहे.